पातूर : तालुक्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १२ पैकी सहा ठिकाणी सरपंच, उपसरपंचांची अविरोध निवड झाली. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत पुरुष उमेदवार गावांचे कारभारी झालेत. चतारी येथील अनुसूचित जमातीचा उमेदवार नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले.
सायवनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शांताराम वासुदेव ताले, उपसरपंचपदी ज्योती संतोष बुंदे यांची अविरोध निवड झाली. उमरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी केशव त्र्यंबक इंगळे, उपसरपंचपदी रूपाली प्रमोद हरमकार यांची अविरोध निवड झाली. राहेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजश्री अशोक बोराडे, उपसरपंचपदी विजय दिनेश पाचपोर यांची अविरोध निवड झाली. पाष्टूल ग्रामपंचायत सरपंचपदी आम्रपाली सिद्धार्थ घुगे, उपसरपंचपदी मंगेश अजाबराव केकन, बेलुरा बु. सरपंचपदी राजेश रामचंद्र भाकरे, उपसरपंचपदी शंकर सूर्यभान दुतोंडे निवडून आले. तांदळी बु. सरपंचपदी अनिल साहेबराव नाकट, उपरपंचपदी दीपाली संतोष नाकट निवडून आले. दिग्रस बु. सरपंचपदी आशा सुधाकर कराळे, सदानंद बाबाराव बराटे उपसरपंचपदी निवडून आले. सस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी द्वारकाबाई आनंदा मेसरे, उपसरपंचपदी संजय रामकृष्ण काशीद, खानापूर सरपंचपदी सुनीता सुधीर देशमुख, विक्रांत विश्वास शिरसाट यांची उपसरपंचपदी अविरोध निवड झाली. चतारी सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. तेथे उमेदवार नसल्याने पद रिक्त राहिले. उपसरपंचपदी सोनू मंगेश लखाडे यांची निवड झाली. देऊळगाव सरपंचपदी पंकोश विठ्ठल सोळंके, उपसरपंचपदी संतोष शंकर बराटे यांची अविरोध निवड झाली. पिंपळखुटा सरपंचपदी अलका सुभाष वाहोकार, उपसरपंचपदी काशीराम सुदाम वानखडे निवडून आले. निवडणूक प्रक्रिया तहसीलदार दीपक बाजड, निवडणूक नायब तहसीलदार विजय खेडकर, सहायक भूषण बोर्डे, दीपक पाटील, सचिन भांबेरे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
फोटो: