शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पातूर: कोरोनाचा उद्रेक सुरूच; एकाच दिवशी ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST

पातूर: शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यातील तब्बल ३२ जणांचा अहवाल कोरोना ...

पातूर: शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यातील तब्बल ३२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १५८१ वर पोहोचली असून, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २१० झाली आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी तालुका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ लस घ्यावी; अथवा तपासणी अहवालाशिवाय कुठल्याही कार्यालयात प्रवेश बंद असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. शहरातील कार्यालयीन परिसरातच स्वॅब व आरटीपीसीआर तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे; मात्र शहरातील व्यावसायिक दुकाने सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिक चिंतित झाले आहेत.

-----------------------------------------------

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले आहेत. नागरिकांनीही कोरोनाविषयी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

-दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.