शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहनांची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:36 IST

पातूर : भरधाव दोन प्रवासी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने एकजण गंभीर, तर तीन जण जखमी झाले. ही घटना पातूर शहरापासून पाच कि.मी. दूर असलेल्या चिंचखेडजवळ गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली.

ठळक मुद्देएक गंभीर, तीन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : भरधाव दोन प्रवासी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने एकजण गंभीर, तर तीन जण जखमी झाले. ही घटना पातूर शहरापासून पाच कि.मी. दूर असलेल्या चिंचखेडजवळ गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली.आसेगाव येथून अकोला येथे जात असलेली प्रवासी वाहन क्रमांक एमएच ३७ जे ५३९ ला पातूरकडून मेडशीकडे जात असलेली दुसर्‍या प्रवासी वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर धडक देणार्‍या प्रवासी वाहनचालकाने वाहनासह पळ काढला. आसेगाव येथून येत असलेल्या प्रवासी गोपाल डिगांबर शिरसाट हे गंभीर जखमी झाले असून, करण थोरात, भगत मानोरकर, ज्ञानेश्‍वर देशमुख हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची भीषणता एवढी होती, की या अपघातात गोपाल शिरसाट यांच्या पायाचा अंगठा व एक बोट जागेवरच तुटून पडले. अपघाताची माहिती मिळताच जखमींना शहरातील हुसेनखा युसूफखा यांनी त्वरित एका वाहनाने पातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता तत्काळ घेऊन आले. पुढील उपचाराकरिता जखमींना अकोला येथे रवाना करण्यात आले असून, वृत लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.

वैद्यकीय अधिकार्‍यांची दांडीया अपघातातील जखमींना हुसेनखा युसूफखा यांनी त्वरित उपचार मिळावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता, नेहमीप्रमाणे ११ वाजतासुद्धा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तथा स्टाफ उपस्थित नव्हता. केवळ बालाजी गव्हाणे फार्मासिस्ट उपस्थित होते. याचवेळी देऊळगाव येथील एका युवकाने विष प्राशन केले असल्याने त्यालासुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणलेले होते; मात्र वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे जखमींना व विष प्राशन केलेल्या युवकाला त्वरित अकोला येथे रवाना करण्यात आले.