विवेक चांदूरकर /अकोलासौर उज्रेचा वापर वाढावा, याकरिता केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाच्या महाऊर्जा या संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अपारंपरिक ऊर्जास्रोतांबाबत जनजागृती व्हावी, याचा वापर वाढावा, याकरिता मनपा, नगर परिषद व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शाळकरी मुलांचा सहभाग घेण्यावर शासनाने भर दिला असून, देश पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा तुटवडा भासत असल्यामुळे ऊर्जा निर्मितीवर र्मयादा येत आहेत. पाण्याची टंचाई भासत असल्याने जलविद्युत निर्मिती, कोळसा संपुष्टात येत असल्याने इंडोनेशियावरून कोळसा आयात करावा लागत असल्याने ऊर्जा निर्मिती खर्चिक होते. त्यामुळे सौर उज्रेच्या पर्यायाकडे वळणे गरजेचे आहे. याकरिता केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगर परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये सौर उज्रेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहन देणार्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वप्रथम या शाळांमध्ये संपूर्ण देशभर एकाच वेळी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांंचे दोन गट करण्यात येणार असून, अपारंपरिक उज्रेला प्रोत्साहन देणार्या विषयांवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. शाळांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांची राज्य स्तरावर परीक्षा होणार आहे. राज्य स्तरावरील प्रथम बक्षीस २0 हजार, द्वितीय १५ हजार तर तृतीय बक्षीस १0 हजार रुपये राहणार आहे. तसेच यामध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना केंद्र सरकारच्यावतीने देशपातळीवर परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये एक लाख रुपयापर्यंत विद्यार्थ्यांंना बक्षिसे मिळणार आहेत. केंद्र शासनाच्यावतीने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांबाबत जागृती वाढावी, याकरिता देशपातळीवर विद्यार्थ्यांंची चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांंना लाखावर बक्षिसे मिळणार आहेत. तसेच ऊर्जा वापराबद्दल जागृतीही निर्माण होणार असल्याचे मनपा केंद्रप्रमुख चंद्रकांत देशपांडे यांनी सांगीतले.
सौर उज्रेचा वापर वाढण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग
By admin | Updated: August 28, 2014 02:19 IST