शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभाग; २५ जणांवर गुन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:05 IST

अंत्ययात्रेत सहभागी होऊन जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील २५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा १३ मे रोजी मृत्यू झाला होता. संचारबंदी व जमावबंदी असतानाही त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक उपस्थित होते. या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अंत्ययात्रेत सहभागी होऊन जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील २५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.शहरातील एका व्यक्तीचा १३ मे रोजी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सर्वोपचार रुग्णालयामध्ये त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. तसेच या व्यक्तीच्या पार्थिवावर १४ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यामुळे संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाची पायमल्ली तसेच कलम १४४ चा भंग केल्याप्रकरणी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या फोरोज खा इनायत खा, सैयद नौशाद सय्यद नासीर, अब्दुल तोहीद, अजुमोद्दीन कुतुबोद्दीन, अहमद अयूब अहमद नासीर, नासिरोद्दीन जमिरोद्दीन, गुलाम हबीब गुलाम मुस्तफा, वसिमोद्दीन निराजोद्दीन व अब्दुल मतीन अब्दुल जब्बार यांच्यासह २५ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी असताना फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, कोणतीही काळजी न घेणे, जमाव करणे व नियमांचा भंग करून कलम १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आसीफ अली यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम १८८ व २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट मूर्तिजापूर शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने संपूर्ण तालुका ढवळून निघाला आहे. याच पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी हेंडज तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अलगीकरण कक्ष व लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली केली व समस्या जाणून घेतल्या.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या