शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थेट रस्त्यावर ‘पार्किंग’; मनपाचा उफराटा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:33 IST

कवच आर्केड कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूच्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वाहनतळाची जागा निश्चित करण्यात आली आहे.

अकोला: शहरात विविध कामकाजानिमित्त दाखल होणाऱ्या नागरिकांची चारचाकी, दुचाकी वाहने ठेवण्यासाठी मनपाने पार्किंगची सोय उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. वाहनतळ नेमक्या कोणत्या ठिकाणी निश्चित करावे, याचे भान प्रशासनाला नसल्याचे समोर आले असून, चक्क रस्त्यावर पार्किंगसाठी जागा राखीव ठेवण्याचा प्रताप मनपाच्या नगररचना, बाजार व परवाना तसेच ‘एनयूएलएम’ विभागाने केला आहे. गांधी रोडवरील कवच आर्केड कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूच्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वाहनतळाची जागा निश्चित करण्यात आली आहे.शहराच्या विविध भागात महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत. यापैकी मुख्य बाजारपेठ व इतर भागातील वाहनांसाठी प्रशासनाने चार वर्षांपूर्वी २२ जागा निश्चित केल्या होत्या. सदर जागा भाडेपट्ट्यावर देण्यासाठी मनपा प्रशासनाने खासगी कंत्राटदारांसोबत करारनामा केले. कंत्राटदारांनी २२ पैकी केवळ १२ जागा निश्चित करून त्याबदल्यात मनपाकडे पैसे जमा केले. सदर जागा वाहनधारकांच्या वाहनांसाठी उपलब्ध असणे भाग होते. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार घडत आहे. वाहनधारकांच्या कटकटीपेक्षा लघू व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी चालक, फळ विके्रत्यांना जागा दिल्यास त्यांच्याकडून जादा रक्कम वसूल करण्याचा फंडा कंत्राटदारांनी शोधून काढला. हाच कित्ता शहरात सर्वत्र राबविल्या जात आहे. वाहनधारकांसाठी जागा नसल्यामुळे ते नाइलाजाने रस्त्यांवर वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे.रस्त्यावर पार्किंग कशी?मनपाच्या नगररचना विभाग, बाजार व परवाना विभाग तसेच ‘एनयूएलएम’ विभागाने पार्किंगच्या जागेसाठी शहरात सर्व्हे केला. दहा ठिकाणी जागा निश्चित करण्यात येऊन त्यामध्ये कवच आर्केडमागील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वाहनतळाला मंजुरी देण्याचा उफराटा कारभार केला. रस्त्यावर पार्किंगचे स्थळ कसे, असा सवाल सुज्ञ अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे.गटनेत्यांचा घसा कोरडा, पण...कवच आर्केड कॉम्प्लेक्सच्या मागील परिसरात लहान मुलांसाठी अनेक हॉस्पिटल आहेत. हा परिसर चौपाटी म्हणून शहरात प्रसिद्ध असून, या ठिकाणी बाराही महिने नागरिकांची गर्दी दिसून येते. अशावेळी रस्त्यावर पार्किंग निश्चित केल्यास व भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करीत भाजपचे गटनेता तथा स्थायी समिती सदस्य राहुल देशमुख यांनी ही जागा रद्द करण्याची मागणी स्थायी समितीमध्ये लावून धरली होती. देशमुख यांचा घसा कोरडा झाला; पण सभागृहाने जागा रद्द केली नाही, हे विशेष.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका