शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबा, आमची शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

संतोषकुमार गवई पातूर : आमची शाळा कधी सुरू होणार आहे, असा प्रश्न सध्या ग्रामीण भागात पाल्य आपल्या पालकांना व ...

संतोषकुमार गवई

पातूर : आमची शाळा कधी सुरू होणार आहे, असा प्रश्न सध्या ग्रामीण भागात पाल्य आपल्या पालकांना व पालक हे पाल्यांच्या गुरुजींना विचारताना दिसून येत आहेत. मागील वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन आणि अनलॉक ही परिस्थिती चालूच आहे. आता पुन्हा शासनाने १५ जूनपर्यंत काही शिथिलता देत लॉकडाऊन कायम केले आहे. मात्र, दरवर्षी १५ जून व २६ जूनपासून शाळेची घंटा वाजत असते; परंतु सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन कायम केल्याने शाळा ऑनलाइनच सुरू होतील. हे जवळपास निश्चित झाले आहे.

शिक्षण ऑनलाइन की, ऑफलाइन हा सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र, शासनाने लॉकडाऊन कायम केल्याने शाळा ऑनलाइनचा मार्ग मोकळा झाल्याचे सध्यातरी दिसत आहे.

आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोका लहान बालकांवर वर्तवल्यामुळे मुले आणि पालकांचे मनोधैर्य टिकवणे हेही महत्त्वाचे आहे. दुसऱ्या लाटेचा आलेख ओसरत असला तरी कोणताही धोका न पत्करता शासनाने शाळा ऑनलाइनच सुरू होतील, असे स्पष्ट संकेत लॉकडाऊन वाढविल्याने दिले आहेत. शाळा सुरू करून शिकणाऱ्या मुलांना केव्हा शाळेत बोलवायचे, हे शिक्षण क्षेत्रात फार मोठे आव्हान येणाऱ्या दिवसांत असणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला बोटावर मोजण्याइतके दिवस बाकी असताना सध्याची परिस्थिती पाहता सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागणार आहे. कारण विद्यार्थ्यांना अजूनही शाळा प्रवेश बंदी कायम आहे. त्यामुळे शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी बिनधास्त असले तरी त्यांच्या भविष्याबाबत पालक अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे शिक्षणाची अनिश्चितता दिसत आहे.

--------------------

कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील, हे अनिश्चित आहे. मुले- मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात, खेळण्यात इतके बेभान झाले आहेत की, ते पालकांचे ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे.

सारिका सचिन कोकाटे

पालक, पातूर