शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवावा - डॉ. विलास भाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 11:46 IST

औद्योगिक वसाहतीतील लोकमत भवनमध्ये लोकप्रज्ञा पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. भाले बोलत होते.

अकोला: विद्यार्थ्यांना प्रज्ञावंत करायचे असेल, तर पालकांना त्यांचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता वाढवावी लागणार आहे. तद्वतच त्यांच्या आवडीच्या विषयाची रुची ओळखून त्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. मुलांची जिज्ञासा ओळखून वाटचाल केल्यास विद्यार्थी प्रज्ञावंत होण्यास पाठबळ मिळत असल्याचे प्रबोधन लोकमत ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.औद्योगिक वसाहतीतील लोकमत भवनमध्ये लोकप्रज्ञा पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. भाले बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहायक कामगार आयुक्त आर. डी. गुल्हाने, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त सहायक संचालक विजय निकोले व शॉप अ‍ॅक्ट अधिकारी आशिष खंडारकर उपस्थित होते. याप्रसंगी लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड अलोककुमार शर्मा, निवासी संपादक रवी टाले, लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा मंचावर उपस्थित होते. लोकमतचे संस्थापक अध्यक्ष स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करू न कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पुढे बोलताना कुलगुरू भाले म्हणाले, आजच्या या स्पर्धेच्या युगात मुलांचे बालपण हरविले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थी पुस्तकात असतात. यंत्रावत होत चाललेले हे जीवन आहे. मुलांची आकलनशक्ती वाढली पाहिजे तसेच घरातूनच त्यांच्यावर संस्कार घडविणे अत्यंत गरजेचे आहे. लोकप्रज्ञा पुरस्कार उपक्रम प्रेरणादायी असून, विद्यार्थ्यांना यातून प्रोत्साहन मिळत असल्याचेही डॉ. भाले म्हणाले. गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात जायचे, याची पालकांनी पाल्याची कल चाचणी, बुद्ध्यांक, अभिरुची, आवड, कौशल्य बघावे, तसे बघितल्यास कोणतीच परीक्षा कठीण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता जे क्षेत्र निवडले, त्याचा सखोल अभ्यास केल्यास यशस्वी होता येते. लोकप्रज्ञा पुरस्कार विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यास प्रोत्साहन देत असल्याचेही ते म्हणाले. खंडारकर यांनी लोकप्रज्ञा पुरस्कार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती, सातत्य ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत असल्याचेही ते म्हणाले. अरुणकुमार यांनी प्रास्ताविकात लोकप्रज्ञा पुरस्काराची माहिती दिली. संचालन आदिती कुळकर्णी यांनी केले. आभार मानव संसाधन व प्रशासन विभागाचे उपव्यवस्थापक रवींद्र येवतकर यांनी मानले. सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लोकप्रज्ञा पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

लोकप्रज्ञा पुरस्कार विजेतेसोहम कीर्तीवार, सिद्धेश येवतकर, जिगिशा देशमुख, तेजस डाहाके, निहारिका येंडे, अर्णव कुटे, ईश्वरी गावंडे, अथर्व सावलकर, उत्कर्ष नाल्हे, बरवा बोडखे, श्रीश जामोदे, नंदिनी गेडाम, ऋषिराज अवस्थी, सानिया उझमा मो. रियाज, हर्षित वाल्हे, कार्तिक कुºहाडे, परम ढमाले, अनया भर्दिंगे, अनुराधा हाके, हर्षल कोथळकर, सुहानी शिंदे, श्रद्धा सवडतकर, वैष्णवी काळे, गार्गी देशमुख, तन्मय पोद्दुतवार, समर्थ सावलकर, निधीश्री ठाकरे, सोहम गवारे, प्रियांशी देशमुख, आर्या ठाकरे, अथर्व अवस्थी, अक्षरा लांडे, ऋतुजा बानाईत, ओम कुटे, मोहित गुल्हाने, मिलिंद गेडाम, कृष्णा वाळके, वेदांत धरमकर, पूर्वी केळकर, जय वानखडे, सुहानी लांडे, यश खुरसडे, मनीष राठोड, साबा फिरदोस मो. रियाज, सारस ढमाले, सौरभ हाके, दक्ष इंगळे, ओम शिंदे, रितिका वाळके, ऋतुजा गिºहे व पल्लवी सवडतकर.

 

टॅग्स :Akolaअकोला