अकोला : अकोला-नागपूर महामार्गावर रिधोरा गावाजवळ लावलेला माहितीदर्शक फलक २0 जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक रस्त्यावर कोसळला. टाटा सुमो रस्त्यावरून जात असतानाच काही सेंकदाच्या फरकाने फलक कोसळल्यामुळे सुमोतील प्रवाशांचे प्राण वाचले. शहरांची तसेच रस्त्याची माहिती असलेला महामार्गावरील लोखंडाचा भलामोठा फलक सायंकाळी अचानक कोसळला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. फलक रस्त्यावर पडल्याची माहिती रिधोराचे पोलिस पाटील सुजय देशमुख यांना मिळाली. त्यांनी त्यांची चमू घेऊन त्वरित फलक रस्त्याच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत केली. यावेळी त्यांच्यासोबत तलाठी प्रशांत सहारे, नितीन देशमुख, विनोद जाधव, प्रकाश लंगोटे, सतीश तिडके, अनिल दंदी, विशाल सोळंके उपस्थित होते. रस्त्यावर फलक पडल्याची माहिती कंट्रोल रूमला दिल्यावरही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.
अकोला महामार्गावर फलक कोसळला
By admin | Updated: June 21, 2014 01:27 IST