शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

पावसाळयात अकोला जिल्ह्यातील  १५९ गावांमध्ये साथरोगाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 2:41 PM

अकोला : पावसाळयाच्या सुरुवातीला जलजन्य साथरोगांचा धोका असलेल्या १५९ गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजनांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत

ठळक मुद्देदरवर्षी पावसाळयाच्या सुरुवातीला अनेक गावांमध्ये पाण्यातून पसरणाऱ्या रोगांची लागण होते. नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजाराचा धोका वाढतो. साथरोग उद्भवल्यास रुग्णांवर तातडीने प्रथमोपचार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे.

अकोला : पावसाळयाच्या सुरुवातीला जलजन्य साथरोगांचा धोका असलेल्या १५९ गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजनांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामस्थांनी आजाराची लक्षणे दिसताच आरोग्य केंद्रात धाव घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.दरवर्षी पावसाळयाच्या सुरुवातीला अनेक गावांमध्ये पाण्यातून पसरणाऱ्या रोगांची लागण होते. मोठ्या प्रमाणात रुग्णांना त्याचा फटका बसल्याने साथरोगात रूपांतर होते. नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजाराचा धोका वाढतो. जिल्ह्यात असा धोका असलेली १५९ गावे असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्या गावांमध्ये पावसाळयात साथरोग उद्भवल्यास रुग्णांवर तातडीने प्रथमोपचार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम.राठोड यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

साथरोगाचा धोका असलेली गावे

अकोला तालुका : म्हैसांग, कट्यार, कपिलेश्वर, वडद, एकलारा, दोनवाडा, कासली बुद्रूक, नावखेड, अंबिकापूर, घुसर, कानशिवणी, येळवण, दुधलम, शिलोडा, खांबोरा, उगवा, पाळोदी, दुधाळा, अमानतपूर, लोणाग्रा, हातला, गांधीग्राम, धामणा, सुकोडा, भोड, पाटी.बार्शीटाकळी : काजळेश्वर, दगडपारवा, दोनद बुद्रूक, रुस्तमाबाद, पिंपळखुटा, विझोरा, कातखेड, फेटरा, महान, दोनद खुर्द, मोºहळ, वडगाव, जनुना, चिंचखेड.

अकोट : कुटासा, आलेवाडी, रेल, गिरजापूर, करतवाडी, विटाळी, वरूर, जऊळका, पिंपळखुटा, पोपटखेड, मुंडगाव, महागाव खुर्द, वस्तापूर, सावरगाव.तेल्हारा : बोरव्हा, पाथर्डी, सिरसोली, अडगाव, भिली, धोंडाआखर, चिपी, करी, चितलवाडी, तळेगाव बाजार, हिवरखेड, हिंगणी बुद्रूक, बेलखेड, पिंपरखेड, चिचारी, चंदनपूर, झरी बाजार, वारी, बारूखेड, नागरदास, उमरशेवडी, दिवाणझरी, नेर, मनब्दा, पंचगव्हाण, दहीगाव अवताडे, मनात्री बुद्रूक, तळेगाव डवला.

मूर्तिजापूर : उमरी, हिरपूर, राजूरा सरोदे, कार्ली, मंगरुळ कांबे, गाझीपूर टाकळी, एंडली, कुरूम, अनभोरा, राजूरा घाटे, सालतवाडा, समशेरपूर.बाळापूर : सातरगाव, हिंगणा, मनारखेड, शेळद, हाता, हातरुण, बोरगाव वैराळे, अंदुरा, सोनाळा, तामशी, पिंपळगाव, धाडी, बल्लाडी, चिंचोली, बटवाडी, सांगवी, खामखेड, मांडवा, कुपटा.

पातूर : शिर्ला, खामखेड, आस्टुल, पास्टुल, कोठारी बुद्रूक, आगीखेड, पाडी, बोडखा, भंडारज बुद्रूक, भंडारज खुर्द, बेलुरा बुद्रूक, बेलुरा खुर्द, तांदळी, दिग्रस खुर्द, विवरा, अंधारसावंगी, चोंढी, आलेगाव, गोळेगाव, चरणगाव, वरणगाव, सोनुना, मळसूर, वसाली, राहेर, अडगाव, झरंडी, गावंडगाव, सावरगाव, वनदेव, सस्ती, दिग्रस, तुलंगा, लावखेड, सांगोळा, पिंपळखुटा, वहाळा, चान्नी, खेट्री, शिरपूर, चांगेफळ, तुलंगा बुद्रूक.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद