शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील कपाशी नुकसानाचे पंचनामे; दहा दिवसांत अहवाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:42 IST

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे  पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील  तहसीलदारांना दिले.

ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भाव ‘आरडीसीं’चे तहसीलदारांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे  पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील  तहसीलदारांना दिले.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी  कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्या तील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे  नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही  नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित  शेतकर्‍यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे तातडीने  पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत ७ डिसेंबर रोजी  जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील  तहसीलदारांची बैठक घेतली. पथके गठित करून, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने  नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून,  अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत  देशपांडे यांनी तहसीलदारांना दिले. या बैठकीला अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर  हांडे, पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे  यांच्यासह जिल्ह्यातील सातही तहसीलदार उपस्थित होते.

‘या’ पथकांमार्फत होणार पंचनामे!कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तालुका स्तरावर पथके गठित  करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार संबंधित तलाठी, कृषी सहायक व  ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या पथकांमार्फत जिल्ह्यातील कपाशी पीक  नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार आहेत.

सहा हजारांवर शेतकर्‍यांच्या तक्रारी!बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाल्याबाबत जिल्ह्यात  कृषी विभागामार्फत बाधित कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून तक्रार अर्ज  स्वीकारण्यात येत आहेत. ८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात सहा हजारांपेक्षा जास्त शे तकर्‍यांनी कापूस पिकाचे नुकसान झाल्याबाबतचे तक्रार अर्ज कृषी विभागाकडे  सादर केले.

पालकमंत्री आज घेणार बैठक!गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात कपाशी पिकाचे झालेले नुकसान आणि  कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्याच्या मुद्यावर पालकमंत्री डॉ. रणजित  पाटील शनिवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियोजन सभागृहात संबंधित विभागप्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या  बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :cottonकापूसAkola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण