शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 13:37 IST

फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे कृषी विभागाच्या चमूद्वारे बुधवारपासून करण्यात येणार आहेत.

- संतोष येलकर

अकोला: पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीतून जिल्ह्यात शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे कृषी विभागाच्या चमूद्वारे बुधवारपासून करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या घरी जाऊन घटनांची माहिती घेण्यात येणार आहे.जिल्ह्यात कपाशी व सोयाबीन पिकावर विविध कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवरील कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी-शेतमजुरांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु जिल्ह्यात गत दोन महिन्यांच्या कालावधीत कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने, १० सप्टेंबरपर्यंत १३८ शेतकरी -शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. कीटनाशकांच्या फवारणीतून विषबाधाच्या घटना वाढल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील विषबाधाच्या घटनांचे पंचनामे जिल्हा कृषी विभागाच्या चमूद्वारे ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या घरी जाऊन, त्यांच्याकडून विषबाधा घटनेची माहिती घेण्यात येणार आहे. कृषी विभागांतर्गत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितींचे कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सत्र अधिकारी, मोहीम अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या चमूद्वारे विषबाधाच्या घटनांचे पंचनामे करण्यात येणार असून, त्यामध्ये घेण्यात आलेल्या माहितीचा अहवाल सात दिवसांत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.पंचनाम्यात अशी घेण्यात येणार माहिती!कृषी विभागाचे अधिकारी विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या घरी जाऊन विषबाधाच्या घटनांचे पंचनामे करणार आहेत. त्यामध्ये कोणते कीटनाशक फवारणी करताना विषबाधा झाली, विषबाधेचे कारण कोणते होते, कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून आवश्यक असलेल्या उपाययोजना केल्या होत्या काय, यासंदर्भात माहिती घेण्यात येणार आहे.१३८ शेतकऱ्यांना विषबाधा; २८ शेतकºयांवर उपचार सुरू!जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने १० सप्टेंबरपर्यंत १३८ शेतकरी-शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी ११० शेतकºयांना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून, विषबाधा झालेल्या २८ शेतकरी-शेतमजुरांवर अद्याप सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटनांचे पंचनामे ११ सप्टेंबरपासून कृषी विभागाच्या अधिकाºयांमार्फत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या घरी जाऊन विषबाधेच्या घटना व कारणांची माहिती घेण्यात येणार आहे.- मिलिंद जंजाळमोहीम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी