शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत राज समितीचा दौरा एप्रिलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 02:46 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच ठरणार दौरा

अकोला, दि. १९- विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने जिल्हा परिषदेचा कारभार तपासणीसाठी ठरलेला दौरा आता एप्रिलमध्येच होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक आणि त्यानंतर लगेच सुरू होणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतरच दौरा निश्‍चित होणार आहे. सद्यस्थितीत पुढील आदेशापर्यंत दौरा पुढे ढकलण्यात येत आहे, असे पत्र विधिमंडळाचे उपसचिव विलास आठवले यांनी बुधवारीच जिल्हा परिषदेला पाठविले आहे. विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा दौरा १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान राहील, त्यासाठी तयारी करण्याचे पत्र आधीच विधिमंडळाकडून जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले. समितीचा दौरा निश्‍चित होण्यापूर्वी राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला नव्हता. ११ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने दोन टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यामध्ये अकोला महापालिकेत २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. हा कार्यक्रम पाहता जिल्हय़ातील सर्वच प्रशासकीय यंत्रणेवर निवडणुकीची कमी-अधिक प्रमाणात जबाबदारी राहणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी गुंतल्यास त्यांना पंचायत राज समितीपुढे उपस्थित राहण्यास कसरत करावी लागेल. त्यामुळे समितीचा दौरा पुढे ढकलण्याची शक्यताच अधिक असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्यासाठी निवडणूक आयोगाने १७ जानेवारी रोजी विधिमंडळाच्या विविध समित्यांना अधिकृतपणे पत्र देत दौरा कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सूचना दिल्या होत्या. आयोगाच्या पत्रानंतर समितीच्या दौर्‍याबाबतची बैठक बुधवारी विधिमंडळात पार पडली. आयोगाने निवडणुकीच्या धामधुमीत समितीच्या दौर्‍यातील संभाव्य कामकाजादरम्यान होणार्‍या बाबी विचारात घेतल्या. त्यानुसार आयोगाच्या पत्रानुसार निवडणूक होईपर्यंत दौरा लांबणीवर पडला, तर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यानंतर लगेच सुरू होणार आहे. ते संपेपर्यंत समितीचा दौरा ठरणार नाही. त्यामुळे आता समितीचा दौरा थेट एप्रिलमध्येच होण्याची शक्यता आहे.