शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

‘पॅनकार्ड क्लब’च्या मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:18 AM

अकोला : गत काही वर्षांपासून वादात सापडलेल्या पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी घटना घडत आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने वादात सापडलेल्या आणि गोठविलेल्या कंपनीच्या स्थावर मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेला हात घातला आहे.

ठळक मुद्दे‘सेबी’ने काढल्यात नोटीसेस गुंतवणूकदारांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही वर्षांपासून वादात सापडलेल्या पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी घटना घडत आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने वादात सापडलेल्या आणि गोठविलेल्या कंपनीच्या स्थावर मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेला हात घातला आहे. स्थावर संपत्तीबाबत जाहीर सूचना देत, संपत्तीची किंमत आणि ठिकाण जाहीर करीत लिलावाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये गुंतविलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.देश आणि  देशाबाहेरील गुंतवणूकदारांना आमिष दाखवून पॅनकार्ड क्लबने कोट्यवधींची रक्कम गोळी केली. गुंतवणूकदारांचा डोलारा देशभरात विस्तारित होत असताना सेबीने कारवाई केल्याने गत काही वर्षांपासून गुंतवणूकदारांची  रक्कम अडकून पडली आहे. सेबीने तातडीने कारवाई करून गुंतवणूकदारांना न्याय द्यावा म्हणून ठिकठिकाणी आंदोलने झालीत. खासदारांना घेराव टाकून देशाचे वित्त मंत्री अरूण जेटली यांच्यापर्यंत हे प्रकरण  गेले. त्यानंतर सेबीला निर्देश देत गुंतवणूकदारांची रक्कम तातडीने मोकळी करण्याचे सांगितले गेले. सेबीला निर्देश मिळताच देशभरातील पॅनकार्ड क्लबच्या संपत्तीच्या विक्री प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. त्याची सुरुवात नोटीसेसपासून झाली असून, संपत्तीचे विवरण आणि किंमत जाहीर केली गेली आहे. आता ठिकठिकणाच्या संपत्तीचा लिलाव करून, त्या रकमेतून गुंतवणूकदारांची रक्कम दिली जाणार आहे.  पॅनकार्ड क्लब लिमिटेड आणि इतर, परसरामपुरिया  प्लान्टेशन्स लिमिटेड, श्री साई स्पेस क्रियेशन लिमिटेड आणि त्यांचे संचालकांची संपत्ती आता लवकरच सेबी विक्री करणार आहे. त्यामुळे गत अनेक वर्षांपासून गोठविल्या गेलेली पॅनकार्ड क्लबमधील रक्कम त्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा  झाला आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरbankबँक