शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

 पॅन कार्ड क्लबमधील गुंतवणूदार सापडले अधांतरी: ७००० कोटींची वसुली; परताव्याची रक्कम मात्र अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 14:15 IST

अकोला : सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदविल्यामुळे अडचणीत आलेल्या पॅन कार्ड क्लबमधील हजारो गुंतवणूकदार अधांतरी सापडले आहेत. कंपनी मालकीच्या जप्तीच्या कारवाईतून ७००० कोटींची वसुली करण्यात आली असली, तरी परताव्याची रक्कम फुगतच आहे

ठळक मुद्देकोट्यवधीच्या या रकमेच्या भरवशावर कंपनीच्या संचालकांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी, तसेच गोवा, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी जंगम मालमत्ता घेतली.कंपनीचे जाळे आणि स्वरूप राज्यभरात विस्तारित होत असताना आणि हजारो लोकांची गुंतवणूक क्लबमध्ये झाल्यानंतर नियमांवर बोट ठेवून सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेत ठेवी गोठविल्या. गुंतवणूकदारांना परतावा द्यावा म्हणून सेबीने देशभरातील पॅनकार्ड क्लबची जंगम मालमत्ता जप्त करून लिलाव केला.

अकोला : सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदविल्यामुळे अडचणीत आलेल्या पॅन कार्ड क्लबमधील हजारो गुंतवणूकदार अधांतरी सापडले आहेत. कंपनी मालकीच्या जप्तीच्या कारवाईतून ७००० कोटींची वसुली करण्यात आली असली, तरी परताव्याची रक्कम फुगतच आहे. त्यामुळे सेबीने अद्याप गुंतवणूकदारांना परतावा दिलेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार संतापले असून, आता त्यांचे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे.पोटाला चिमटा देत पै-पै जोडून पॅन कार्ड क्लबमध्ये हजारो लोकांनी गुंतवणूक केली. कोट्यवधीच्या या रकमेच्या भरवशावर कंपनीच्या संचालकांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी, तसेच गोवा, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी जंगम मालमत्ता घेतली. कंपनीचे जाळे आणि स्वरूप राज्यभरात विस्तारित होत असताना आणि हजारो लोकांची गुंतवणूक क्लबमध्ये झाल्यानंतर नियमांवर बोट ठेवून सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेत ठेवी गोठविल्या. यामध्ये अनेक कंपन्यादेखील सापडल्यात. सर्वसामान्यांचे घामाचे दाम कंपनीत अडकून असल्याने आंदोलन उभे झाले. थेट देशाचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लक्ष घालून न्याय देण्याचे आश्वासन दिलेत. गुंतवणूकदारांना परतावा द्यावा म्हणून सेबीने देशभरातील पॅनकार्ड क्लबची जंगम मालमत्ता जप्त करून लिलाव केला. त्यातून आतापर्यंत ७००० कोटींची वसुली करण्यात आली. आता रक्कम मिळणार असल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्यात. पण वसुलीपेक्षा जास्त रक्कम परताव्यासाठी हवी असल्याने सेबीने कारवाई थांबविली. सेबीने २३ जानेवारी १८ रोजी याबाबत सुनावणी केली. दरम्यान, पॅनकार्ड क्लबच्या सीएमडीची संपत्ती फेब्रुवारीत जप्त केली जाणार होती. दरम्यान, गुंतवणूकदारांनी संतुलन गमाविल्याने २६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी मोर्चा सेबीवर काढला गेला. सेबीची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप होत असून, गुंतवणूकदारांना रक्कम मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEconomyअर्थव्यवस्था