शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘पी इंटरनॅशनल सीस्टिम’ने विस्तारले विदर्भावर जाळे!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 15:14 IST

गुंतवणुकीच्या आठव्या स्टेपवर ३२ लाख देण्याचा दावा कंपनीने केला असला तरी अद्याप कुणालाही एवढी रक्कम मिळालेली नाही; मात्र अनेकजण कंपनीच्या आमिषाला बळी पडत आहेत.

- संजय खांडेकर

 अकोला : सव्वादोन हजार गुंतवा अन् घरबसल्या लाखो कमवा..., असे गोंडस आमिष देत पी इंटरनॅशनल सीस्टिमने विदर्भात कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे जाळे विस्तारण्यास सुरुवात केली आहे. नागपूर, गोंदियाकडून झिरपत आलेली ही नेटवर्क सीस्टिम आता अकोल्यात दाखल झाली आहे. अल्पावधीतच या कंपनीचे तीनशे प्रतिनिधी अकोल्यात सक्रिय झाले आहेत.२२५० रुपयांची गुंतवणूक आणि डाउन लाइनमध्ये केवळ दोन मेंबर करण्याची अट असल्याने या नेटवर्क सीस्टिमचे जाळे दिवसेंदिवस दूरवर पसरत चालले आहे. हजारो लोकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केल्याने अनेकांना परतावा मिळत असल्याने दररोज शेकडो नवे गुंतवणूकदार आपसूकच जोडले जात आहेत. गुंतवणुकीच्या आठव्या स्टेपवर ३२ लाख देण्याचा दावा कंपनीने केला असला तरी अद्याप कुणालाही एवढी रक्कम मिळालेली नाही; मात्र अनेकजण कंपनीच्या आमिषाला बळी पडत आहेत. सव्वादोन हजार गुंतवा अन् घरबसल्या लाखो कमवा..., असा मॅसेज देणारे लोक अलीकडे अनेकांच्या अवती-भोवती फिरून गळ घालत आहेत. कंपनी विदेशाची असली तरी कंपनीचे अनेक प्रवक्ते तेलंगणा, आंध्र प्रदेशातील दिसत आहेत. याच प्रदेशातून पी इंटरनॅशनल नेटवर्क सीस्टिमचे जाळे झिरपत आता महाराष्ट्र आणि विदर्भात पोहोचले आहे. नागपूर, अकोलासह विदर्भातील ११ जिल्ह्यांत आतापर्यंत हजारो लोकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.गत चार वर्षांपासून अनेकांनी लाखो रुपये कसे कमाविले, याचे दाखले देणारे अनेक व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि यू-ट्यूबवर टाकले जात आहेत. गुंतवणूक कशी करावी, म्हणजे आपण लखपती होऊ शकता... याचे दाखले देत लोकांना या जाळ्यात ओढल्या जात आहे. अकोल्यातही आतापर्यंत तीनशे लोकांचे नेटवर्क तयार झाले असून, नागपूर परिसरात हे जाळे मोठ्या प्रमाणात विणल्या गेले आहे. आॅटो पोल इन्कमचे टप्पे देण्यात आले असून, ४० ते ५० दिवसांत आणि ९० ते १०० दिवसांत किती रक्कम गुंतवणूकदारांना मिळेल, याची आकडेवारी देण्यात आली आहे. लाखो रुपये देण्याचे आमिष देत असलेल्या कंपनीचा व्यवसाय काय, याबाबत मात्र कुठेच स्पष्ट माहिती नाही. हजारो गुंतवणूकदारांना लाखोंचा परतावा मिळणार असल्याने अनेकजण यामध्ये सहजपणे जुळत आहेत. अनेकांचे संपर्क क्रमांक आणि पत्तेदेखील देण्यात आले आहेत; मात्र कंपनीच्या म्होरक्यांचा पत्ता नाही. कंपनीचे बरे-वाईट झाले तर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक