शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिमीटर बंद; तरीही नागरिकांची तपासणी सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 09:40 IST

ऑक्सिमीटर नादुरुस्त असल्याने तपासणी करूनही काय उपयोग, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

बोरगाव वैराळे: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत गावात तपासणी सुरू केली आहे. आशासेविका, अंगणवाडी सेविकामार्फत घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. येथे सुद्धा तपासणी सुरू आहे; मात्र ऑक्सिमीटर बंद असल्याने तपासणी निष्फळ ठरत आहे. ऑक्सिमीटर नादुरुस्त असल्याने तपासणी करूनही काय उपयोग, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. तपासणी अपयशी ठरत असल्याने येथे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्र्तविण्यात येत आहे.हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथे स्थानिक ग्रामपंचायतने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविक ांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आहेत का, याचे सर्वेक्षण होत आहे. तपासणीसाठी तापमापक यंत्र व ऑक्सिमीटर देण्यात आले आहेत; मात्र गावात ऑक्सिमीटर नादुरुस्त असल्याने विना ऑक्सिमीटरशिवाय तपासणी केली जात आहे. ही तपासणी निष्फळ ठरत असून, याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुर्लक्ष होत आहे. तपासणी केवळ कागदावरच होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीशी संपर्क केला असता उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहे. तपासणी निष्फळ ठरत असून, गावात कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. गावागावात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा कार्यक्रम राबवून गावातील प्रत्येक व्यक्तीचे यंत्राद्वारे आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या आहेत. यामध्ये कामचुकारपणा होऊ नये, याची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. बोरगाव वैराळे येथे ऑक्सिमीटर बंद पडले असेल, तर नवीन मीटर उपलब्ध करून पुन्हा आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना ग्रामसेवकास देण्यात येतील.-पुरूषोत्तम भुसारी, तहसीलदार, बाळापूर.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या