लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुडधीमध्ये बेवारस कारमध्ये सापडलेल्या आठ किलो गांजाचा मालक सिव्हिल लाइन पोलिसांना आठ महिन्यांनंतर गवसला. पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सिव्हिल लाइन पोलिसांनी गांजा व कार जप्त करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुडधी परिसरात कारमध्ये गांजा कोणी आणला आणि कार बेवारस सोडून आरोपी कुठे पळाले, याचा तपास पोलीस करीत आहेत. शहरातील गुडधीमध्ये काल रात्रीपासून एमएच 0२ जे ७५६७ क्रमांकाची एक बेवारस कार उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासणी केल्यावर पोलिसांना कारमध्ये ८ किलो ६८८ ग्रॅम गांजा ठेवलेला दिसून आला. पोलिसांनी गांजा व कार जप्त केली. या गांजाची किंमत ३४ हजार रुपये आहे. ग्रामीण भागामध्ये हा गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार्या व्यक्तींना संशय आल्यामुळे त्यांनी जागेवरच कार सोडून पळ काढला होता. सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. कारचालकाची माहितीसुद्धा पोलिसांनी काढली; परंतु आरोपी मिळत नव्हता. तब्बल आठ महिन्यांनंतर आरोपी गोकुळ महादेव चांदुरकर (रा. हरिहरपेठ) याला गुरुवारी उशिरा रात्री अटक केली. त्याने गांजा त्याचाच असल्याची कबुली दिली. सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात आरोपी गोकुळला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
अकोला-गुडधी येथे बेवारस कारमध्ये सापडलेल्या गांजाचा मालक अखेर गवसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:08 IST
अकोला : गुडधीमध्ये बेवारस कारमध्ये सापडलेल्या आठ किलो गांजाचा मालक सिव्हिल लाइन पोलिसांना आठ महिन्यांनंतर गवसला. पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
अकोला-गुडधी येथे बेवारस कारमध्ये सापडलेल्या गांजाचा मालक अखेर गवसला!
ठळक मुद्देआठ महिन्यांपूर्वीचा गुन्हा उघडकीस आरोपीस शनिवारपर्यंत पोलीस कोठडी