शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात गाडी चालविण्याच्या परवान्याचेही होऊ शकते नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST

अकाेला : परदेशात वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे गरजेचे असते. विदेशात तर हे नियम अत्यंत कडक आहेत. मात्र, मुदत ...

अकाेला : परदेशात वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे गरजेचे असते. विदेशात तर हे नियम अत्यंत कडक आहेत. मात्र, मुदत संपलेले परवान्यांचे नूतनीकरण आरटीओ कार्यालयातही होते. अकाेला आरटीओ कार्यालयात दरवर्षी परवान्यांची नूतनीकरणाची संख्या कमी असून, गेल्या पावणेदोन वर्षांत फक्त ३५ जणांनी परवान्यांचे नूतनीकरण केले आहे. दरम्यान, नूतनीकरणासाठी मात्र नवा परवाना काढण्याएवढीच प्रक्रिया करावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशात वाहने चालविण्याचे परवाने काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. स्थानिक वाहन परवाना काढण्यासाठी ज्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करावा लागतो, त्याप्रमाणे परदेशी वाहन परवान्यांच्या नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नागरिकांना आरटीओ कार्यालयातर्फे तारीख दिली जाते. त्या तारखेला आरटीओ कार्यालयात जाऊन त्या नागरिकांनी मूळ पासपोर्ट, व्हिसा आणि वाहन परवाना दाखविणे गरजेचे आहे. तसेच मूळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टचा पत्ता हा एकच असणे आवश्यक आहे. यावेळी आरटीओ विभागातर्फे संबंधित नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरणासाठी १००० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहे.

असा काढावा आंतरराष्ट्रीय परवाना

- परदेशात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आरटीओ नियमानुसार ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, शुल्कदेखील ऑनलाइनच भरणे गरजेचे आहे. त्यानंतर शुल्क भरल्याची प्रिंट काढून आरटीओ कार्यालयात सादर करावी लागते. आरटीओ कार्यालयाकडे पासपोर्ट, व्हिसा आणि वाहन परवाना दाखवावा लागतो. मात्र, ही कागदपत्रे दाखविण्यासाठी मूळ कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे.

- यानंतर आरटीओ कार्यालयाकडून या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर संबंधित नागरिकाला एका वर्षाच्या मुदतीसाठी परवाना देण्यात येत आहे.

- एका वर्षाचा परवाना संपल्यानंतर, पुन्हा नव्याने अर्ज करून हा परवाना काढावा लागतो.

कोण काढू शकतो हा परवाना

- ज्या नागरिकांकडे परदेशात राहण्याचा व्हिसा व पासपोर्ट आहे, अशा नागरिकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो.

- वाहन परवाना देताना आरटीओ प्रशासनातर्फे संबंधित नागरिकाचे मूळ लायसन्स पाहूनच पुढील प्रक्रिया केली जाते.

- मूळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टवरील पत्ता हा एकच असणे गरजेचे आहे. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, एका दिवसात हा वाहन परवाना दिला जातो.

आरटीओ कार्यालयातर्फे परदेशात गाडी चालविण्यासाठी परवान्याच्या नूतनीकरणासाठी नवा परवाना काढण्याच्या नियमाप्रमाणे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. संबंधित नागरिकांकडे अगोदरचे लायसन्स असल्यामुळे पुन्हा त्यांची कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. तसेच इतर सर्वसाधारण लायसन्सप्रमाणे नियमानुसार शुल्क आकारले जाते.

ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकाेला

कोरोनाकाळात संख्या घटली

२०१८ - २३

२०१९ - २२

२०२० - ०७

२०२१- ०६