शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कर; मालमत्ता जप्तीसाठी नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:09 IST

कर जमा न केल्यास मालमत्तांना कुलूप लावण्याच्या कारवाईला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे.

अकोला: प्रभागात मूलभूत सुविधा मिळत नसल्याची ओरड करून महापालिकेच्या नावाने नाके मुरडणाऱ्या सुशिक्षित व उच्चभु्र नागरिकांकडे कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. जबाबदार अकोलेकर या नात्याने मनपाकडे कराची थकबाकी जमा करणे भाग असताना तसे होत नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीसाठी नोटीस जारी केल्याची माहिती आहे. कर जमा न केल्यास मालमत्तांना कुलूप लावण्याच्या कारवाईला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे.महापालिका प्रशासनाने २०१६ मध्ये सुधारित मालमत्ता कर लागू केला. ही रक्कम अवाजवी असल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना व भारिपने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उच्च न्यायालयाने मनपाने लागू केलेली कर पद्धत रद्द करीत नव्याने कर आकारणीचा आदेश दिला. त्यामुळे करबुडव्या मालमत्ताधारकांसाठी ही संधीच चालून आली. अकोलेकरांनी मालमत्ता कर जमा करण्याविषयी खातरजमा न करताच थकीत कर जमा करण्यास हात आखडता घेतला. प्रत्यक्षात मनपाने सुधारित दरवाढीनुसार लागू केलेला कर वसूल करण्याची उच्च न्यायालयाने मुभा दिली आहे. अकोलेकरांनी कर जमा न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यासही प्रशासनाला मोकळीक आहे. अशा स्थितीतही सुज्ञ अकोलेकर मालमत्ता कराची थकबाकी जमा करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधितांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कर विभागाने नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निर्धारित मुदतीत थकबाकी जमा न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई होणारच, असे कर अधीक्षक विजय पारतवार यांनी स्पष्ट केले आहे.‘प्रेशर’आणल्यास वेतनाची समस्या!शहरातील प्रथितयश डॉक्टर, विधीज्ञ, उद्योजक, व्यापारी, प्राचार्य यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची रक्कम थकीत आहे. ही रक्कम जमा करताना संबंधितांनी सत्ताधारी भाजपाच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर केल्यास महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होईल. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या अधिकच बिकट होईल. त्यामुळे मनपाचा प्रशासकीय डोलारा कोसळण्याची दाट शक्यता आहे.अशी चर्चा महापालिकेच्या वर्तुळात शुक्रवारी होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका