शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नऊ लाखांवर वीज ग्राहकांनी केली मोबाइल क्रमांकाची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:29 IST

वीज का गेली, महावितरणचे वीज बिल किती आले, मीटर रीडिंग झाली की नाही, या व अशाप्रकारच्या वीज ग्राहकांना उपयुक्त ...

वीज का गेली, महावितरणचे वीज बिल किती आले, मीटर रीडिंग झाली की नाही, या व अशाप्रकारच्या वीज ग्राहकांना उपयुक्त असणाऱ्या माहितींचे विविध ‘अपडेट्स’ महावितरणकडून सातत्याने देण्यात येतात. हे ‘अपडेट्स’ ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या अधिकृत मोबाइलवर पाठविण्यात येतात. त्यामुळे अशी महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे असते. पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींची माहिती दरमहा ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येते.

अकोला जिल्ह्यांतर्गत ०३ लाख ७० हजार ८१० ग्राहकांपैकी ०३ लाख २८ हजार १९५ ग्राहकांनी आपले मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदविले आहेत. अकोला ग्रामीण विभागातील ०१ लाख ५२ हजार ६६० ग्राहकांपैकी ०१ लाख ३७ हजार ३५० वीज ग्राहकांनी, अकोला शहर विभागातील ०१ लाख ३१ हजार ७४७ ग्राहकांपैकी ०१ लाख २१ हजार ९३८ ग्राहकांनी, अकोट विभागातील ८६ हजार ४०३ ग्राहकांपैकी ६८ हजार ९०७ ग्राहकांनी आपल्या मोबाइल नंबरची नोंदणी केल्याने त्यांना महावितरणचे अपडेट्‌स नोंदणीकृत मोबाइल नंबरवर मिळत आहे.

बुलडाणा जिल्ह्यांतर्गत बुलडाणा विभागातील ०१ लाख ५३ हजार ८६१ ग्राहकांपैकी ०१ लाख ३८ हजार ७८८ वीज ग्राहकांना, खामगाव विभागातील ०१ लाख ७० हजार १२८ ग्राहकांपैकी ०१ लाख ५२ हजार ६४७ वीज ग्राहकांना आणि मलकापूर विभागातील ०१ लाख २८ हजार १४९ ग्राहकांपैकी ०१ लाख २० हजार ४१ ग्राहकांना म्हणजेच जिल्ह्यातील ०४ लाख ५२ हजार १३८ ग्राहकांपैकी ०४ लाख ११ हजार ४७६ ग्राहकांना महावितरणच्या या अपडेट्‌स सुविधेचा लाभ मिळत आहे.

वाशिम जिल्ह्यातील ०१ लाख ८४ हजार ३९८ ग्राहकांपैकी ०१ लाख ६१ हजार ७४ ग्राहकांनी आपले मोबाइल नंबर महावितरणकडे नोंदणी केल्याने त्यांना महावितरणच्या वरील सुविधेचा लाभ मिळत आहे. अकोला परिमंडळांतर्गत असलेल्या तिन्ही जिल्ह्यांतील मोबाइल नंबर नोंदणी झालेल्या ग्राहकांची टक्केवारी बघितल्यास सर्वांत जास्त म्हणजे ९१.०१ टक्के बुलडाणा जिल्हा, ८८.५१ टक्के अकोला जिल्हा आणि ८७.३५ टक्के वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणचे अपडेट्‌स मिळत आहे.