शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘किसान सन्मान’च्या हफ्त्याला ८ हजारांवर शेतकरी मुकणार! इ-केवायसी व आधार प्रमाणिकरण बाकी

By रवी दामोदर | Updated: February 26, 2024 19:38 IST

 अकोला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत १६ वा हप्ता व नमो किसान महासन्मान निधीचे दोन हफ्त्याचे वितरण शेतकऱ्यांना लवकरच करण्यात येणार आहे.

रवी दामोदर, अकोला :  अकोला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत १६ वा हप्ता व नमो किसान महासन्मान निधीचे दोन हफ्त्याचे वितरण शेतकऱ्यांना लवकरच करण्यात येणार आहे. परंतू जिल्ह्यात अद्यापही ८ हजार ६४१ शेतकऱ्यांची इ-केवायसी व आधार प्रमाणिकरण बाकी असल्याने ते शेतकरी किसान सन्मानच्या हफ्त्याला मुकण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात कृषी विभागामार्फत मोहीम राबवून जनजागृती सुरू असून, पात्र शेतकऱ्यांनी इ-केवायसी व आधार प्रमाणिकरण करण्याची आवश्यकता आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभर्थ्यांचे इ-केवायसी, बँक खाते आधार सलग्नी करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी शासनाने बंधनकारक केलेल्या आहेत. योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत दि. १२ ते २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत इ-केवयासी व बँक खाते आधार सलग्न करणेबाबत मोहीम राबविण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही अकोला जिल्ह्यात ३ हजार १०५ लाभार्थी शेतकऱ्यांची इ-केवायसी व ५ हजार ५३६ लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार सलग्न करणे प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी शासनाने बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करून घेण्याची गरज आहे. अन्यथा ‘पीएम किसान’च्या १६ वा हप्त्यापासून व नमो किसान महासन्मान निधीच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतील.इ-केवायसी व बँक खाते आधार सलग्नी करणे संदर्भात काही अडचण असल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क करावा.- शंकर किरवे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला.