शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

परिमंडळाची थकबाकी ९३ कोटींवर; वसुलीबाबत मुख्य अभियंता गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:19 IST

परिमंडळाची थकबाकी ९३ कोटींवर पोहोचल्याने ती वसूल करण्याचा मुद्दा मुख्य अभियंता अनिल डोये यांनी गांभीर्याने घेतला आहे.

अकोला: ग्राहकाला समाधानकारक वीज सेवा देण्याबरोबरच वितरित केलेल्या प्रत्येक युनिटच्या बिलाची सक्षमपणे वसुली होणे गरजेचे असताना वाढती थकबाकी ही महावितरणसाठी आव्हान ठरत आहे. अकोला परिमंडळाची थकबाकी ९३ कोटींवर पोहोचल्याने ती वसूल करण्याचा मुद्दा मुख्य अभियंता अनिल डोये यांनी गांभीर्याने घेतला असून, वसुली व ग्राहक सेवेत निष्काळजी करणाºया बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील उपविभागीय अभियंता दहीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून थकबाकी वसुलीबाबत ‘कॅज्युअल अ‍ॅटिट्युड’ असणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे. त्याचवेळी थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देशही मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत.अकोला परिमंडळांतर्गत असलेल्या अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक शुक्रवारी विद्युत भवन येथे पार पडली. या बैठकीत सविस्तर आढावा घेताना मुख्य अभियंता यांनी परिमंडळांच्या वाढत्या थकबाकीला अधिकारी व कर्मचाºयांची हलगर्जी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत वसुलीबाबत हयगय करणाºयावर सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले.परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण ९३ कोटी रुपये वीज देयकापोटी थकीत आहेत. थकबाकीचा हा डोंगर कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने वसुली मोहीम अधिक तीव्रपणे राबवावी, थकबाकीदारांचा वीज पुरवठा हा नियमानुसार खंडित झालाच पाहिजे, न करणाºयावर कारवाई करावी, वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केवळ वीज बिल वसुलीसाठी करण्यात येत असल्याची जाणीव ग्राहकांना करून देऊन ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याची सवय लावावी, संवेदनशील भागात वीज कर्मचाºयांनी समूहाने जाऊन थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा, अधिकारी व कर्मचाºयांनी योग्य समन्वयातून काम करावे, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.या बैठकीला अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, वाशिम जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, प्रणाली विश्लेषक, वित्त व लेखाचे विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.८ आॅगस्टपर्यंत वसुली करा!अकोला परिमंडळातील थकबाकीचा डोंगर वाढला असून, येत्या ८ आॅगस्टपर्यंत ही थकबाकी वसूल करण्याचे निर्देशच मुख्य अभियंता डोये यांनी या बैठकीत दिले. वसुली करतानाच ग्राहक सेवेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही डोये यांनी यावेळी केल्या. वसुलीसंदर्भात ९ आॅगस्ट रोजी आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळ