शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

बाह्यस्रोत तंत्रज्ञांची ९८०० रुपये वेतनावर बोळवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 13:19 IST

१५ हजार ४७९ दरमहा वेतन मिळणे क्रमप्राप्त असताना आतापर्यंत केवळ ८५०० व नोव्हेंबर महिन्यापासून ९८०० रुपये वेतनावर बोळवण होत असल्याचा आरोप या कामगारांनी तक्रारीतून केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन कायदा व भारतीय कामगार कायद्यानुुसार वेतन मिळत नसल्याची तक्रार महावितरणच्याअकोला मंडळातील विविध वीज केंद्रांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी बाह््यस्रोत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांनी माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली आहे. नियमानुसार कपातीनंतर १५ हजार ४७९ दरमहा वेतन मिळणे क्रमप्राप्त असताना आतापर्यंत केवळ ८५०० व नोव्हेंबर महिन्यापासून ९८०० रुपये वेतनावर बोळवण होत असल्याचा आरोप या कामगारांनी तक्रारीतून केला आहे.महावितरणच्या अकोला जिल्ह्यातील विविध वीज केंद्रांवर जवळपास १२५ बाह्यस्रोत तंत्रज्ञ देखभाल दुरुस्तीचे कामे करीत आहेत. हे सर्व कामगार औरंगाबाद जिल्ह्यातील आजुबाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेद्वारे बाह्यस्रोत कामगार म्हणून कार्यरत असून, त्यांना १ आॅक्टोबर २०१९ पासून २० टक्के वाढीव पगारानुसार दरमहा २६ दिवसांचे १७ हजार ४७ रुपये वेतन आहे.त्यामध्ये १५६८ रुपयांची शासकीय कपात झाल्यानंतर या कामगारांच्या बँक खात्यात दरमहा १५ हजार ४७९ रुपये वेतन मिळणे क्रमप्राप्त आहे; परंतु आतापर्यंत दरमहा केवळ ८५०० रुपये मिळत होते. यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून १३४०० रुपये एवढा पगार होईल, असे सांगण्यात आले.प्रत्यक्षात मात्र ९८०० रुपये पगार घ्यावा व वरील ३६०० रुपये कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावे, असे सांगण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्त्या तंत्रज्ञांनी केला आहे.या कामगारांचे अजूनपर्यंत बँक खातेही उघडण्यात आले नसून, विड्रॉल स्लिपवर सह्या घेण्यात आल्या आहेत, तसेच शासकीय कपात कोठे व कोणत्या खात्यात जमा होते, विमा काढला आहे अथवा नाही, याचीही माहिती नसल्याचे तक्रारदार कामगारांनी निवेदनात म्हटले आहे. नियमानुसार शासकीय कपात करून वेतन अदा करावे व आमचा जीवन विमा काढावा,अशी मागणीही या कामगारांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन डॉ. पाटील यांनी मुख्य अभियंत्यांशी पत्रव्यवहार करून माहिती मागविली आहे.

बाह्यस्रोत कामगारांची सेवा पुरविणाºया कंत्राटदार संस्थेच्या खात्यात महावितरणकडून दरमहा निश्चित रक्कम वळती केली जाते. सदर कंत्राटदार संस्था कामगारांना योग्य वेतन देत आहे किंवा नाही, याचीही खातरजमा आम्ही केली आहे. त्यामुळे महावितरणचा याच्याशी संबंध नाही. या तक्रारीच्या संदर्भात आमदार डॉ. रणजित पाटील यांनी मागविलेली माहिती लवकरच देण्यात येईल.- अनिल डोये, मुख्य अभियंता, अकोला परिमंडळ.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण