शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर तुडतुडे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 10:26 IST

कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत.

अकोला: गत दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर तुडतुड्यांसह फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत.जिल्ह्यात काही ठिकाणी कपाशीवर तुडतुड्यांसह फुलकिड्यांचादेखील प्रादुर्भाव वाढत आहे. फुलकिड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या शिरेजवळ राहून पानातील रस शोषून घेत आहेत. फुलकिड्यांनी रखडलेल्या भागावर पांढुरके चट्टे दिसून येत आहेत. प्रादुर्भावग्रस्त भागातील कपाशीच्या पानांच्या पेशी शुष्क होत असून, जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या भागात कपाशीच्या पानांचा रंग लाल होत आहे. पात्या आणि बोंडावरही प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. यावर अंकुश लावण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना व्यवस्थापनासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.असे करावे व्यवस्थापन

  • नत्र खताचा वापर शिफारशीनुसारच करावा. अवास्तव वापर टाळावा.
  • पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडीराक्टीन १५०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडीराक्टीन ३००० पीपीएम ४० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • आठवड्यातून किमान एक वेळा पिकाचे सर्वेक्षण करावे.
  • किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यासच (२ तुडतुडे प्रती पान, १० फुलकिडे प्रती पान) रासायनिक व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

त्याकरिता प्राफेनोफॉस ५० इसी मिली (एकरी ४०० मिली) किंवा बुप्रोफेझीन २५ एस सी २० मिली (एकरी ४०० मिली) किंवा प्लोनिकअमीड ५० डब्ल्यू डी जी ४ ग्राम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर तुडतुड्यांसह फुलअडीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकºयांनी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे.- डॉ. चारुदत्त ठिपसे, कृषी विज्ञान केंद्र,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोला