शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मळसूर परिसरातील बकऱ्यांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

अमोल देवकते मळसूर : पातूर तालुक्यातील मळसूर येथे गुरांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गत आठवड्याभरात दोन बकऱ्या, ...

अमोल देवकते

मळसूर : पातूर तालुक्यातील मळसूर येथे गुरांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गत आठवड्याभरात दोन बकऱ्या, दोन म्हैसींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच येथून जवळच असलेल्या उमरा येथील पशू वैद्यकीय रुग्णालयातील दुरवस्था झाल्याने पशुपालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

मळसूर परिसरात गुरांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. गत दोन-तीन दिवसांपासून परिसरात पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच गुराढोरांवर अज्ञात आजाराने हल्ला चढविल्याने शेतकऱ्यांसह पशुपालक चिंतेत सापडले आहे. गुरे आजारी होताच मळसूर येथील पशुपालक येथून ज‌वळच असलेल्या उमरा येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात गुरांना उपचारासाठी नेतात. मात्र येथील पशू वैद्यकीय रुग्णालयाची दुरवस्था झाल्याने पशुपालक हैराण झाले आहे. याबाबत पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, त्यांचा मोबाईल बंद असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे. त्यामुळे पशुपालकांना नाईलाजाने खासगी डॉक्टरांकडे उपचार करावा लागत असल्याने पशुपालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावात पाहणी करून पशुपालकांची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

---------------------------

दोन बकऱ्या, दोन म्हैसींचा झाला मृत्यू

मळसूर परिसरात ताप येणे, चारा न खाणे आदी लक्षणे असलेल्या आजाराने गुरांना ग्रासले आहे. याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालक चिंतेत सापडले आहे. अज्ञात आजारामुळे मळसूर येथील श्रीधर गिरी यांच्या दोन बकऱ्या, तर दिनकर देवकते यांच्या दोन म्हैसींचा मृत्यू झाला आहे.

-------------------

वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू

माझी बकऱ्या बऱ्याच दिवसांपासून अज्ञात आजाराने ग्रासलेल्या होत्या, गावात पशुवैद्यकीय अधिकारी येत नाही. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने दोन्ही बकऱ्या दगावल्या आहेत.

- श्रीधर गिरी, पशुपालक, मळसूर.

---------------------------

उमरा येथील पशू वैद्यकीय दवाखाना नेहमी बंद असल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. उपचार अभावी दोन म्हैसींचा मृत्यू झाला आहे.

-दिनकर देवकते, पशुपालक, मळसूर.