शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

‘आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा पुन्हा तयार होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:54 IST

पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा व २०२०-२१ चा वार्षिक आराखडा निश्चित करण्याची तयारी राज्य स्तरावर सुरू झाली आहे.

अकोला : राज्यात गेल्या तीन वर्षांत राबविण्यात आलेल्या आमचं गाव, आमचा विकास, उपक्रमानंतर येत्या २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा व २०२०-२१ चा वार्षिक आराखडा निश्चित करण्याची तयारी राज्य स्तरावर सुरू झाली आहे. त्यासाठी २ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत ग्रामसभा घेऊन त्यामध्ये आराखडा निश्चित केला जाणार आहे. आराखड्यांचा अहवाल ३१ जानेवारी २०२० पर्यंत शासनाकडे सादर करावा लागणार आहे.यापूर्वी चार वर्षांचा विकास आराखडा निश्चित झाला होता. त्यापैकी झालेली कामे वगळून नवा आराखडा तयार करावा लागणार आहे. गेल्या आराखड्यातील शिल्लक कामे, गावाच्या आणखी गरजा, आवश्यकता, गावकऱ्यांचे पुढील नियोजन विचारात घेऊन ग्रामसभेमार्फत कामांचा प्राधान्यक्रम ठरणार आहे. त्यासाठी गावातील विविध घटकांशी विचारविनिमय करणे, त्यांच्या गरजा, मागण्या विचारात घेऊन कामे, उपक्रमांचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल. पुढील पाच वर्षांत ग्रामपंचायतींना प्राप्त होणाºया निधीच्या दुप्पट रकमेची कामे आराखड्यात समाविष्ट केली जातील.- अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभाग्रामसभेत आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समितीच्या प्रत्येक गणातील गावांची जबाबदारी विस्तार अधिकाºयांवर दिली जाईल. गावातील महिला, युवती, युवक, आर्थिक व सामाजिक कमकुवत घटकांना समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक गणात एका मुख्य सेविकेचीही निवड करून प्रशिक्षण दिले जाईल.- ग्रामसभेत द्यावी लागणार संपूर्ण माहिती!ग्रामसभेत ग्रामपंचायतने आतापर्यंत हाती घेतलेले उपक्रम, कामे, त्यावर झालेला खर्च, शिल्लक निधी, पुढील पाच वर्षांत मिळणारे उत्पन्न, इतर निधीची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. सोबतच यापूर्वी ग्रामपंचायतने ठरविलेला कामांचा प्राधान्यक्रम, गावाच्या गरजा, अडचणी, त्यावरील उपाययोजनांची अंमलबजावणीही सांगितली जाईल.- ग्रामसभेच्या पूर्वी तीन सभाग्रामपंचायतींमध्ये मुख्य ग्रामसभेच्या आधीच्या दिवशी महिला सभा, मागासवर्गीय व वंचित घटकांची सभा, बालसभा अशा तीन सभा घ्याव्या लागतील. त्या तिन्ही सभांतील चर्चा व शिफारशी याबाबत ग्रामपंचायतने आराखडा निश्चित करण्यासाठी ग्रामसभेत चर्चा होईल. बालसभेत गावातील सर्व मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, १८ वर्षांपर्यंतच्या मुले-मुली उपस्थित राहतील.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजना