शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या मागासपणाचे मूळ शेतकरीविरोधी कायद्यात - अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:01 IST

सिलिंग, जमीन अधिग्रहण आणि  आवश्यक वस्तू कायदा हे शेतकर्‍यांचे गळफास ठरले आहेत. ते रद्द  झाल्याशिवाय शेतकरी बंधमुक्त होणार नाही, शेतीच्या मागासपणाचे मूळ या शे तकरीविरोधी कायद्यांमध्येच असल्याचा घणाघाती आरोप  शेतकरी नेते,  अभ्यासक अमर हबीब यांनी केला. 

ठळक मुद्देशेतकरीविरोधी कायद्यांचा अकोटात जागर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : भारतीय संविधानात शेतकरीविरोधी कायदे घुसवून राज्यकर्त्यांनी  गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांचे शोषण चालविले आहे. मूळ संविधानात  परिशिष्ट नऊ घुसवून शेतकर्‍यांना न्यायालयाचे दरवाजे बंद करण्याचे काम त त्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी केले. सिलिंग, जमीन अधिग्रहण आणि  आवश्यक वस्तू कायदा हे शेतकर्‍यांचे गळफास ठरले आहेत. ते रद्द  झाल्याशिवाय शेतकरी बंधमुक्त होणार नाही, शेतीच्या मागासपणाचे मूळ या शे तकरीविरोधी कायद्यांमध्येच असल्याचा घणाघाती आरोप  शेतकरी नेते,  अभ्यासक अमर हबीब यांनी केला. ‘लोकजागर मंच’च्या वतीने ‘शेतकर्‍यांचा गळफास ठरलेले कायदे’ या  विषयावर जाहीर भाषणाचे आयोजन ३ डिसेंबर रोजी अकोटात करण्यात आले  होते. यावेळी ते बोलत होते.  खा. संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार  पडलेल्या या कार्यक्रमाला लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे, शेतकरी  नेते ललित बहाळे, पुरुषोत्तम आवारे पाटील, अँड. सुधाकर खुमकर, गजानन  बोरोकार, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब  आवारे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.अमर हबीब यांचे भाषण ऐकण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या शेतकर्‍यांनी  अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह खचाखच भरलेले होते. आपल्या  जवळपास तासाभराच्या भाषणाने हबीब यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. सरकारी  नोकरीतील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याला किमान १८ हजार रुपये मासिक वेतन  मिळायला हवे, अशी शिफारस सातव्या वेतन आयोगातील तरतुदीत करतात.  मग शेतकर्‍याचे काय, असा सवाल उपस्थित करून शेतकर्‍यांच्या हातात  किमान वर्षाला सव्वादोन लाख रुपये पडायला हवेत, असे हबीब म्हणाले.  कोणताही व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाने किती दुकाने थाटावित, याला  काही बंधन नाही. एखाद्या डॉक्टरने, वकिलाने किती व्यवसाय करायचा  यावरही बंधन नाही. मग शेतकर्‍यांना ५४ एकराचे बंधन का, असा सवाल उ पस्थित करून त्यांनी सिलिंग कायद्याची खिल्ली उडविली. एकदा कर्जमाफीची  घोषणा केल्यानंतर त्यात वेळोवेळी दुरुस्त्या करणार्‍या मुख्यमंत्र्यांचीही त्यांनी  टर उडविली. सिलिंग कायद्याप्रमाणेच आवश्यक वस्तूंचा कायदा शे तकर्‍यांसाठी कसा जीवघेणा आहे, हे हबीब यांनी सोदाहरण स्पष्ट केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकजागर मंचचे सरचिटणीस पुरुषोत्तम अवारे पाटील  यांनी केले.  लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी मंचाची भूमिका  मांडली.  या कार्यक्रमातच पुरुषोत्तम अवारे आणि अनिल गावंडे यांनी संपादित  केलेल्या ‘कायदे जेव्हा जीवघेणे ठरतात’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. संचालन लोकजागर मंचचे कार्याध्यक्ष अँड. सुधाकर  खुमकर यांनी केले, तर अनंतराव सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.  -

टॅग्स :Akola cityअकोला शहर