शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने अकोल्यात रविवारी ‘सुमेरु संध्ये’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:08 IST

अकोला: श्री श्री रविशंकरजी प्रणित ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने नववर्ष पर्वावर अकोलकर नागरिकांना सत्संगाची संगत मिळावी या हेतूने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक शालिनी व श्रीनिवास यांची भव्य संगीत संध्या अर्थात ‘सुमेरू संध्ये’चे आयोजन.

ठळक मुद्देहरीश लाखानी यांनी स्थानीय रघुवंशी मंगल कार्यालय सभागृहात बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.प्रस्तुत संगीत संध्या ही अकोलकर नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आली असून, नागरिकांनी या संगीतमय संध्येचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

अकोला: श्री श्री रविशंकरजी प्रणित ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने नववर्ष पर्वावर अकोलकर नागरिकांना सत्संगाची संगत मिळावी या हेतूने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक शालिनी व श्रीनिवास यांची भव्य संगीत संध्या अर्थात ‘सुमेरू संध्ये’चे आयोजन रविवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६-३० वा. डॉ .आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराचे हरीश लाखानी यांनी स्थानीय रघुवंशी मंगल कार्यालय सभागृहात बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी परिवाराचे वरिष्ठ शिक्षक कैलाश अग्रवाल,जिल्हा विकास समिती सदस्य सुहासिनी धोत्रे,जगन्नाथ कराळे,महेंद्र खेतान, पुरुषोत्तम पसारी,श्रीकांत पडगिलवार,जसवंत कावणा,आशिष झुनझुनवाला, डॉ.अरुण देशमुख आदी पदाधीकारी उपस्थित होते.‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने जगभरात माणुसकी व सदाचार जिवंत ठेवणारे अनेक कल्याणकारी व मानवोपयोगी उपक्रम सुरु आहेत.या सेवाभावी कार्यात गुरुदेवांचे कोट्यवधी शिष्य जगभरात जुळलेले असून रचनात्मक कार्ये होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ म्हणजे जीवन जगण्याची कला असून, या माध्यमातून परिवाराच्याअनेक शाखांत योग्य व एकाग्रतेचे लहान मुलांपासून तो प्रौढ व्यक्तीपर्यंतचे कोर्सेस सुरु आहेत. प्रस्तुत संगीत संध्या ही अकोलकर नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आली असून, नागरिकांनी या संगीतमय संध्येचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवाराचे सदस्य प्रशिक्षक संतोष मारशेट्टीवार, ज्ञानेश्वर कपले, रामकृष्ण दालमिया, प्रशांत साबळे, सुधीर इंगळे,अर्चना मारशेट्टीवार,आरती देशपांडे, अ‍ॅड. मनीषा कुलकर्णी, दीपक वोरा, शाम विसपुते, दिनेश मुरजानी, संजय शेळके, अंबादास सिंघानिया, राम घायाळ, प्रवीण शिंदे ,कांचन शिंदे, नयना शेगोकार, सुनीता शर्मा आदी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

टॅग्स :Art of Livingआर्ट आॅफ लिव्हिंगAkola cityअकोला शहर