शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिर्ला येथील उच्चविद्याविभूषित युवकाने उत्पादित केली सेंद्रिय हळद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:45 IST

शिर्ला: शिर्ला येथील स्वप्निल सुहास कोकाटे यांनी गुजरातमध्ये असलेल्या लाख रुपयांच्या नोकरीवर लाथ मारून झीरो बजेट सेंद्रिय हळदीची शेती करीत लाखो रुपये कमाईचा मार्ग चोखाळला.

ठळक मुद्देनोकरीऐवजी शेतीला दिले प्राधान्य

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला: शिर्ला येथील स्वप्निल सुहास कोकाटे यांनी गुजरातमध्ये असलेल्या लाख रुपयांच्या नोकरीवर लाथ मारून झीरो बजेट सेंद्रिय हळदीची शेती करीत लाखो रुपये कमाईचा मार्ग चोखाळला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एमएससी कृषी पदवीप्राप्त स्वप्निल सुहासराव कोकाटे यांनी गुजरात येथील लाख रुपयांची नोकरी सोडून झीरो बजेट सेंद्रीय हळदीची शेती करीत एकरी ३ लाख २0 हजार रुपये शुद्ध नफा मिळविला आहे. त्यांनी सात एकर लागवडीतून सुमारे २२ लाख ४५ हजार रुपये शुद्ध नफा प्राप्त केला आहे.मागील दोन वर्षांपासून त्यांच्या प्रयोगाला सातत्याने यश मिळाले आहे. स्वप्निल कोकाटे यांनी सांगितले की, शेतीत सर्वाधिक ५0 टक्के खर्च  बी-बियाण्यांवर होतो. त्यानंतर कीटकनाशके, रासायनिक खते यावर खर्च होतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून शेतकरी मोठय़ा प्रमाणात अडचणीत येतो. त्यानंतर पारंपरिक पिकांना बाजारपेठेत भाव नाही, त्यामुळे आम्ही सेंद्रिय हळद व रेशीम शेतीकडे वळलो. परिणामी उत्पादन खर्च घटला, नफा वाढला.हळदीला एकरी २५-३0 हजार खर्च येतो; मात्र उत्पन्न ३ लाख २0 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, ती जनावरांपासून सुरक्षित आहे. कंदवर्गीय पीक असून, ती रोगकिडीस प्रतिकारात्मक आहे. तसेच त्यामुळे शेतीची सुपिकता वाढवण्यात मदत होते. विशेष बाब म्हणजे या पिकाचे बेणे विकत घ्यावे लागत नाही. झेडबीएनएफ यंत्रणांवर आधारित मालाला देश-विदेशात चांगली मागणी आहे. या पिकावर कीटकनाशकांच्या पारंपरिक फवारण्या करण्याऐवजी त्यांनी जीवामृत, ताक, दशपर्णीचा वापर केला. शेतकर्‍यांनी खर्चिक पारंपरिक शेती करून आत्महत्येचा मार्ग चोखाळण्याऐवजी झीरो बजेट सेंद्रिय शेती करावी, असा संदेश स्वप्निल कोकाटे यांनी दिला.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणagricultureशेती