शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

पोलीस अधीक्षकांच्या बदलीचा आदेश धडकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 11:36 IST

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचे आदेश दिले होते.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातून ३५ महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती.गृह खात्याने अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना जबाबदार धरीत त्यांची तडकाफडकी बदली केली.बदलीचे आदेश धडकले असून, नवीन एसपींची मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांची तक्रार न घेता त्यांनाच त्रास दिल्यानंतर या पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेताच खडबडून जागा झालेल्या गृह खात्याने अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना जबाबदार धरीत त्यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर मंगळवारी पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश धडकले असून, नवीन एसपींची मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे.शहरात राहणाऱ्या एका पालकाच्या तक्रारीनुसार, त्यांच्या अल्पवयीन मुलीला पवन प्रमोद नगरे, अलका नगरे यांनी फूस लावून पळवून नेले.या प्रकरणात संबंधित पालकाने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यावरही मुलीचा शोध घेतला नाही, तसेच पोलिसांना आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलीस अधीक्षक, ठाणेदारांकडेसुद्धा सातत्याने तक्रार केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कंटाळून पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती.याचिकेवर सुनावणी करताना, दोन महिन्यात अकोला जिल्ह्यातून ३५ महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. न्यायालयाने पोलिसांना बेपत्ता मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही, त्यामुळे न्यायालयाने पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावला होता. त्यानंतरही पोलीस अधीक्षक गावकर न्यायालयात हजर झाले नाहीत. एकंदरीतच प्रकरणात पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकाने केला होता. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचे आदेश दिले होते, तसेच सिव्हिल लाइनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, महिला तपास अधिकारी पीएसआय कराळे यांना निलंबित करण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक पदासाठी यांच्या नावाची चर्चापोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नितीन लोहार, निकेश खाटमोडे पाटील यांच्यासह आणखी दोन नावांची चर्चा सुरू आहे. एसपींच्या बदलीचे आदेश धडकले असले तरी नवीन एसपींचे नाव अद्यापही स्पष्ट झाले नाही. गंभीर प्रकरणाचे तपास तसेच अनेक महत्त्वाचे बंदोबस्तही सध्या रखडल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस