शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:35 IST

फेब्रुवारी, मार्च २0१९ च्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत.

अकोला: राज्य शासनाने राज्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असून, या तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार फेब्रुवारी, मार्च २0१९ च्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत.शासनाने अकोला जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळग्रस्त केले आहेत. या तालुक्यामधील गावांची यादीसुद्धा जाहीर केली आहे. दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिवांकडून परत करण्यात येणार आहे. या दृष्टिकोनातून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या पात्र इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी तातडीने शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती वेगवेगळी सादर करावी. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, इंडेक्स नंबर, शाळेचा पत्ता, मुख्याध्यापक, प्राचार्यांचे नाव, विद्यार्थ्यांचे मूळ गाव, बँक खाते क्रमांक, शाखेचे नाव, आयएफएससी कोड, विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक, शाखा आदी माहिती सादर करावी, असे निर्देेश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा