शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला जिल्ह्यात ३१ केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 11:09 IST

बियाणे उत्पादकांचे प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील ३१ बियाणे विक्री केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश देण्यात आला आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत जिल्ह्यात ५ जुलैपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत बियाणे उत्पादकांचे प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील ३१ बियाणे विक्री केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश देण्यात आला आहे.खरीप हंगामातील पेरण्यांच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत जिल्ह्यातील बियाणे विक्री केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये बियाणे विक्री केंद्रातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी बियाण्यांचे नमुने घेण्यात येत असून, बियाणे विक्री केंद्रांमध्ये बियाणे उत्पादक प्रमाणपत्र -१ व २ उपलब्ध आहे की नाही, यासंदर्भात तपासणी करण्यात येत आहे. भरारी पथकांनी ५ जुलैपर्यंत केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ३१ बियाणे विक्री केंद्रांमध्ये बियाणे उत्पादक प्रमाणपत्र- १ व २ आढळून आले नाही. त्यामुळे बियाणे उत्पादक प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील ३१ बियाणे विक्री केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश जिल्हा परिषद कृषी विभागांतर्गत भरारी पथकांच्या बियाणे निरीक्षकांमार्फत देण्यात आला. त्यानुसार संबंधित बियाणे विक्री केंद्रांमार्फत होणारी बियाणे विक्री बंद करण्यात आली आहे.बियाणे विक्री बंदचा आदेश दिलेली अशी आहेत केंद्र!तालुका केंद्रअकोला १५तेल्हारा ०२बाळापूर ०७अकोट ०१मूर्तिजापूर ०२बार्शीटाकळी ०२पातूर ०२..................................एकूण ३१संकरित कपाशी बियाण्याचे सात नमुने अप्रमाणित!जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत जिल्ह्यातील विक्री केंद्रांच्या तपासणीत बियाण्यांचे १६९ नमुने घेण्यात आले. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, मूग व उडीद इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. घेतलेल्या नमुन्यांपैकी बियाण्यांच्या ५९ नमुन्यांचा तपासणी अहवाल नागपूर येथील बियाणे विश्लेषण प्रयोगशाळेकडून जिल्हा परिषद कृषी विभागाला प्राप्त झाला. त्यानुसार संकरित कपाशी बियाण्याचे सात नमुने अप्रमाणित आढळले. त्यामुळे संकरित कपाशी वाणाचे बियाणे विक्री बंदचा आदेश संबंधित बियाणे विक्री केंद्रांना देण्यात आला आहे.संकरित कपाशी बियाण्याचे सात नमुने अप्रमाणित आढळून आल्याने संबंधित बियाणे विक्री केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश देण्यात आला आहे. तसेच बियाण उत्पादक प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात ३१ केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश देण्यात आला आहे.- मिलिंद जंजाळमोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, कृषी विभाग.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय