शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

रिकामटेकड्यांची वाहने जप्त करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:07 IST

गाड्या जमा करून ठेवण्यासाठी शास्त्री स्टेडियमची जागा वापरण्यास परवानगीही दिली आहे.

अकोला : जिल्ह्यात संचारबंदी काळातही कोणतेही कारण नसताना आपली वाहने घेऊन फिरणाऱ्या रिकामटेकड्यांची वाहने जप्त करून शास्त्री स्टेडियममध्ये संचारबंदी संपेपर्यंत ठेवण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले असून, गाड्या जमा करून ठेवण्यासाठी शास्त्री स्टेडियमची जागा वापरण्यास परवानगीही दिली आहे.जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले असतानाही या ना त्या कारणाने उगीचच वाहने घेऊन भटकंती करणाऱ्यांची संख्या व उपद्रव वाढत चालला असून, त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मूळ हेतू साध्य होत नाहीय. यामुळे लोक घराबाहेर पडून फिरत तर असतात; पण हेच लोक नंतर पुन्हा आपल्या कुटुंबात जातात. सद्यस्थितीत हे धोकादायक ठरू शकते. लोकांना दैनंदिन आवश्यक वस्तू व सामान खरेदीसाठी विकेंद्रित पद्धतीने उपलब्धता सर्वच भागात करून देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या घरापासून अगदी जवळच्या ठिकाणी लोक शक्यतो पायी जाऊन भाजीपाला, किराणा, आवश्यक औषधी खरेदी करू शकतात; मात्र काही लोक हे विनाकारण आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन शहरात फिरत असतात. या लोकांची चौकशी करून त्यांचे बाहेर फिरण्याचे कारण संयुक्तिक नसल्यास त्यांची वाहने पोलीस आता जप्त करून ती शास्त्री स्टेडियमच्या जागेत ठेवणार आहेत. यासंदर्भात पोलिसांनी कडक कारवाई करावी व विनाकारण फिरणाºयांना आळा घालावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcollectorजिल्हाधिकारी