शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य कपात केलेली ‘जीएसटी’ची रक्कम परत करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 12:21 IST

अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यापोटी आधीच ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही जिल्हा परिषदेतील विकास कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला.

ठळक मुद्देबार्शीटाकळी तालुक्यातील कामांसाठी दिलेल्या आदेशातून जिल्हाभरात हा गोंधळ उडाला होता.कंत्राटदारांच्या देयकातून १२ ते १८ टक्के निधीची कपात करण्यात आली.त्याची चौकशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली.

अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यापोटी आधीच ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही जिल्हा परिषदेतील विकास कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. हा नियमबाह्य प्रकार असल्याच्या तक्रारी सातत्याने झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी ती रक्कम परत करण्याचा आदेश दिला.शासनाने १९ आॅगस्ट २०१७ व ११ सप्टेंबर २०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार वस्तू व सेवाकर विचारात घेऊन अंदाजपत्रके तयार करण्याचा आदेश दिला होता. त्यावर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी बार्शीटाकळी तालुक्यातील कामांसाठी दिलेल्या आदेशातून जिल्हाभरात हा गोंधळ उडाला होता. समाजकल्याण विभागाने दलित वस्तीच्या कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून पंचायत समिती स्तरावर राखीव ठेवण्याचा आदेश बार्शीटाकळीच्या गटविकास अधिकाºयांना दिला. त्या पत्राच्या आधारे जिल्ह्यातील सर्वच गटविकास अधिकाºयांनी कंत्राटदारांच्या देयकातून १२ ते १८ टक्के निधीची कपात करण्यात आली. त्याचवेळी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दलित वस्ती विकास योजनेची कामे केली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीएसटी कपातीची रक्कम अडकवून ठेवण्यात आली. एकाच कामासाठी एकाच वेळी ग्रामपंचायतींकडून दोन वेळा जीएसटी वसूल केला जात आहे. ही बाब कोणत्या नियमात बसते, याची माहितीच गटग्रामपंचायत चोहोगावच्या सरपंच लीलाबाई अशोकराव कोहर यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रारीतून मागवली आहे. या प्रकरणात चौकशी करावी, तसेच ज्या ग्रामपंचायतींच्या देयकातून १२ टक्के निधी राखून ठेवण्यात आला, तो तातडीने अदा करावा, अशी मागणीही कोहर यांनी निवेदनात केली होती. त्याची चौकशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली. त्या अहवालानुसार रक्कम परत करण्याचा आदेश देण्यात आला.- जीएसटी कपातीच्या साहित्याचा कामात वापरकामात वापरलेले सर्व साहित्य जीएसटीधारकांकडूनच खरेदी केले आहे. त्याच्या जीएसटी रकमेसह पावत्या आहेत. सोबत सिमेंट, रेती, गिट्टी, मुरूम या साहित्य पुरवठादारांनी दिलेल्या पावत्यांमध्येही जीएसटी कपातीची नोंद आहे. तरीही त्याच कामाच्या देयकातून पुन्हा १२ टक्के निधी जीएसटी शुल्क म्हणून राखीव ठेवण्यात आला. तो आता ग्रामपंचायती, कंत्राटदारांना परत दिला जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद