शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारी प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 14:49 IST

प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश सावकारांचे महानिबंधक तथा विशेष निबंधक सहकारी संस्था यांनी २७ मे रोजी दिला आहे.

अकोला -सहकारी संस्थेच्या तत्कालीन तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी एकाच कुटुंबातील चार जणांना अवैध सावकारी प्रकरणात निर्दोष सोडले होते. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश सावकारांचे महानिबंधक तथा विशेष निबंधक सहकारी संस्था यांनी २७ मे रोजी दिला आहे. त्यामुळे अनुप डोडिया व त्यांच्या कुटुंबातील चार जणांची अवैध सावकारी प्रकरणात पुन्हा तालुका उपनिबंधक यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे.रतनलाल प्लॉट चौकातील रहिवासी अनूप डोडिया त्यांचे वडील निरंजन डोडिया, आशिष डोडिया व प्रियंका डोडिया या चार जणांना २३ मे २०१७ रोजी सहकारी संस्थेच्या तत्कालीन तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी अवैध सावकारी प्रकरणात चौकशी करून निर्दोष सोडले होते. फुपाटे यांनी चौकशी केल्यानंतर त्यांना निर्दोष असल्याचा अहवाल जिल्हा निबंधक यांच्याकडे पाठवीला होता. या विरोधात तक्रारकर्ते मनीष देशमुख यांनी पुणे येथील सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रार करून अवैध सावकारी प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर सहकार आयुक्त पुणे यांनी मनीष देशमुख व डोडिया कुटुंबीय यांचे बयाण नोंदविल्यानंतर याप्रकरणी सुरेखा फुपाटे यांनी डोडिया कुटुंबीयांना निर्दोष सोडल्याचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे नमूद करीत या अवैध सावकारी प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. तालुका उपनिबंधक या प्रकरणाची पुन्हा चौकशी करतील, असेही आदेशात नमूद आहे. त्यामुळे डोडिया कुटुंबीय यांना निर्दोष सोडणाऱ्या सुरेखा फुपाटे यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचीही तक्रार मनीष देशमुख यांनी केली आहे. तालुका उपनिबंधक यांनी दिलेला २०१७ चा आदेश रद्द कायद्यानुसार नसल्यामुळे या अवैध सावकारी प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश सावकारांचे महानिबंधक तथा विशेष निबंधक सहकारी संस्था जोगदंड यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला