शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:12 IST

अकोला : गळा आवळून खून केल्यानंतर घरजावई असलेल्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणार्‍या सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला आहे. 

अकोला : गळा आवळून खून केल्यानंतर घरजावई असलेल्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणार्‍या सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला आहे. सोळाशे प्लॉटमधील सय्यद निजाम सय्यद वाहेद यांचा मुलगा सय्यद वसीम सय्यद निजामचा विवाह जबरदस्तीने फिरोज खान सालार खान, बानोबी सालार खान यांनी त्यांची मुलगी सलमाबी हिच्यासोबत लावल्याचा आरोप मृतकाच्या पित्याने केला आहे. विवाहानंतर काही दिवसांनी सालारखान यामीन खान, बानोबी सालारखान, फिरोज खान सालार खान, अफरोज सालार खान, अमजद खान सालार खान, जुनेद खान सालार खान यांनी सय्यद वसीम सय्यद निजाम याला मारहाण करून त्याचा गळा आवळला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पित्याने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले होते. पोलिसांनी यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांकडून केलेल्या पंचनाम्याबाबत शंका निर्माण झाल्याने मृतकाच्या पित्याने न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायाधीश डी. एस. दाभाडे यांनी याप्रकरणात सदर सात जणांविरुद्ध खून, कट रचने यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. याचिकाकर्त्यांकडून अँड. अली रजा खान यांनी कामकाज पाहिले.