शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. सभेतील ठरावाविरुद्ध आमदारांसह विरोधकांची 'सीईओ' कडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 11:15 IST

निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे यावेळी करण्यात आली.

अकोला : जिल्हा परिषदेच्या १४ सप्टेंबर रोजीच्या आॅनलाइन सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेल्या विविध ठरावाविरुद्ध आमदार नितीन देशमुख यांच्यासह विरोधकांनी शुक्रवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) धाव घेत, सभेचे कामकाज चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (डीसीईओ) निलंबित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.१४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. या सभेत घेण्यात आलेले विविध ठराव आणि सभेतील कामकाजाच्या मुद्यावर आमदार नितीन देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर यांनी १८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन चर्चा केली. आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पांढुर्णा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी निविदा स्वीकृती, ६९ गावे नवीन पाणीपुरवठा योजना कामास मान्यता देणे इत्यादी दोन विषय प्रलंबित ठेवण्यात आले असून, विविध ठराव मंजूर करण्यात आले. सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांवर मतदान घेण्याची मागणी करून आक्षेप घेतला; मात्र यासंदर्भात दखल घेण्यात आली नाही. सभेचे कामकाज चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांच्या विरुद्ध निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सूरज गोहाड उपस्थित होते.

 

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदAkolaअकोला