शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका हद्दवाढीला विरोध !

By admin | Updated: March 10, 2016 02:32 IST

अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर; शासनाकडे पाठविणार

अकोला: शहरातील समस्या लक्षात घेता, महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला तीव्र विरोध करीत, आधी शहराचा विकास करण्यात यावा, नंतरच शहराजवळील गावांचा शहरात समावेश करण्यात यावा, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला. स्थायी समितीचा हा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती , पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रस्तावित मनपा हद्दवाढीला विरोध करीत, हद्दवाढीच्या विषयावर किमान एक वर्षानंतर शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी सदस्य विजय लव्हाळे यांनी सभेत केली, तसेच मनपा हद्दवाढीस विरोध नाही; मात्र आधी शहराचा विकास करण्यात यावा, त्यानंतरच हद्दवाढ करून शहराजवळील गावांचा मनपा क्षेत्रात समावेश करण्याची मागणी सदस्य दामोदर जगताप यांनी केली. मनपाच्या प्रस्तावित हद्दवाढमध्ये अकोला शहराजवळील २४ गावांचा मनपा क्षेत्रात समावेश होणार आहे; मात्र शहराची सध्या अवस्था बघता, पिण्याचे पाणी, रस्ते, प्रदूषण अशा अनेक समस्या आहेत. शहरातील समस्या काढून, आधी शहराचा विकास करण्यात यावा, त्यानंतर हद्दवाढ करून गावांचा मनपा क्षेत्रात समावेश करण्यात यावा, अशी मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली. मनपा हद्दवाढीस सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने, यासंबंधीचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. आधी शहराचा विकास करा, नंतरच हद्दवाढ करण्यात यावी, असा मंजूर करण्यात आलेला ठराव जिल्हाधिकारी व शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांनी सांगितले.