शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उपमहापौरांसह विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

By admin | Updated: May 5, 2016 03:11 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात मित्रपक्ष शिवसेनेनेच तलवार उपसल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले.

अकोला: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात मित्रपक्ष शिवसेनेनेच तलवार उपसल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. सभेची टिप्पणी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सभा सुरू न करण्याचा पवित्रा सेनेचे उपमहापौर विनोद मापारी यांनी घेतला. उपमहापौरांच्या भूमिकेला विरोधकांनी दाद दिल्याने सभागृहातील गोंधळ वाढत गेल्याचे पाहून महापौर उज्ज्वला देशमुख यांनी ३0 मिनिटांसाठी सभा स्थगित केली. यानंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरू होताच, अवघ्या दहा मिनिटांत विषयांना मंजुरी देऊन महापौरांनी सभा गुंडाळली.मनपाच्या मुख्य सभागृहात स्थगित सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू होण्यापूर्वी भारिप-बमसंच्या नगरसेविका अरुंधती शिरसाट यांनी सभागृहात महिला नगरसेविकांचा अपमान होईल असे शब्दप्रयोग पुरुष नगरसेवकांनी टाळावेत, अशी मागणी केली. न पटणार्‍या विषयांना विरोध करण्याची भाषा सौम्य असावी, अशी सूचना त्यांनी केली. या सूचनेला सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार यांनी अनुमोदन दिले. यादरम्यान अचानक शिवसेनेचे उपमहापौर विनोद मापारी यांनी विषयपत्रिकेची टिप्पणी अद्यापही न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करीत, जोपर्यंत टिप्पणी मिळत नाही, तोपर्यंत सभेचे कामकाज सुरू न ठेवण्याची भूमिका मांडली. उपमहापौरांच्या दिमतीला तातडीने विरोधी पक्षनेता साजिद खान, भारिपचे गटनेता गजानन गवई धावून आले. सत्तेत मित्रपक्ष म्हणून शिवसेना असली तरी ३0 एप्रिल रोजी आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बैठकीचे निमंत्रण सेनेला नसल्याचा विषय विनोद मापारी यांनी उकरून काढला. यावर ही बैठक केवळ भाजप लोकप्रतिनिधींची असल्याने निमंत्रणाचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सभापती विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले.