शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर ‘सीओ’च्या विरोधात हक्कभंग, आ. बाजोरिया आक्रमक; घरकुल योजना, घुंगशी बॅरेज प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 09:48 IST

अकोला : एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत मूर्तिजापूर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचा पात्र लाभार्थींना नऊ वर्षांपासून ताबाच मिळाला नाही. ७३२ पेक्षा जास्त लाभार्थी योजनेपासून उपेक्षित आहेत. घरकुल योजनेसोबतच घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूरपर्यंतच्या पाइपलाइनची माहिती सादर न करणे मूर्तिजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या अंगलट आले असून, विधान परिषदेचे सदस्य गोपीकिशन बाजोरिया ...

अकोला : एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत मूर्तिजापूर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचा पात्र लाभार्थींना नऊ वर्षांपासून ताबाच मिळाला नाही. ७३२ पेक्षा जास्त लाभार्थी योजनेपासून उपेक्षित आहेत. घरकुल योजनेसोबतच घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूरपर्यंतच्या पाइपलाइनची माहिती सादर न करणे मूर्तिजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या अंगलट आले असून, विधान परिषदेचे सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी मुख्याधिकारी डोल्हारकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी मंगळवारी शासनाकडे सादर केली आहे. एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत मूर्तिजापूर येथे १ हजार ७ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. २00८-0९ पासून सदर घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. २६९ चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरकुलासाठी शासनाने एक लाख रुपये अनुदान मंजूर केले होते. त्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थींना १२ ते १५ हजार रुपये लाभार्थी हिस्सा जमा करणे भाग होते. कालांतराने अनुदानात २५ हजार व नंतर पुन्हा ७५ हजार रुपये वाढ केल्यामुळे एका घरकुलासाठी दोन लाखांचे अनुदान देण्यात आले. मागील नऊ वर्षांच्या कालावधीत घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी नगर परिषद प्रशासनाकडे ज्या लाभार्थींनी आर्थिक हिस्सा जमा केला, त्या ३५0 लाभार्थींपैकी २७५ लाभार्थींंना घरकुलांचा ताबा देण्यात आला. उर्वरित ७३२ लाभार्थींना घरकुलांचा ताबा दिलाच नाही. १३ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घरकुलांचे वाटप करण्याचे मुख्याधिकार्‍यांना स्पष्ट निर्देश होते. घरकुल योजनेसंदर्भात आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांना वारंवार विचारणा केल्यावरही ते थातूरमातूर उत्तरे देत असल्याचे दिसून आले. 

घुंगशी बॅरेज, पाइपलाइनची माहिती नाही!घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूरपर्यंंतच्या पाइपलाइनच्या कामाची माहिती मागितली असता मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी माहितीच उपलब्ध केली नसल्याचा मुद्दा आ. बाजोरिया यांनी पत्रात नमूद केला आहे. ५ फेब्रुवारी रोजी घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूरपर्यंंत पाइपलाइन टाकण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रण न देणार्‍या मुख्याधिकार्‍यांनी अवमान केल्याचे नमूद करीत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र विधान परिषद नियम २४0 अन्वये हक्कभंगाची सूचना दाखल करण्याची मागणी आ. बाजोरिया यांनी केली आहे.