शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अकोटात योजनेच्या बनावट अर्जांची खुलेआम विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:33 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमार्फत विविध  लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांच्या नावांचा  गैरवापर करीत ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या बनावट योजनेच्या  नावावर अकोट शहरात लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्दे‘प्रधानमंत्री बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेच्या नावावर लूट

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमार्फत विविध  लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांच्या नावांचा  गैरवापर करीत ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या बनावट योजनेच्या  नावावर अकोट शहरात लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. दररोज  तहसील परिसरातील व इतर दुकानांमध्ये या योजनेच्या अर्जांची मोठय़ा प्रमाणात  विक्री सुरू आहे. या गैरप्रकारातून मुलींच्या पालकांची आर्थिक लूट केली जात  आहे. प्रधानमंत्री बेटी बचाओ योजनेच्या बनावट अर्जांची विक्री शहरातील काही  दुकानांवर २0 ते २५ रुपयांत केली जात आहे. या अर्जांवर संपूर्ण माहिती  भरावयाची असून, हा अर्ज भरणार्‍या सर्व मुलींना दोन लाख रुपये मिळणार  असल्याचे अर्जावर नमूद केले आहे. अर्जासोबत आधार कार्ड, बँक खाते  क्रमांक, बोनाफाईड, नगरसेवक किंवा सरपंचाचे ओळखपत्र आदी कागदपत्रं  जोडून, हा अर्ज नवी दिल्ली येथील भारत सरकार महिला एव् बाल विकास  मंत्रालयात पाठविण्याचा पत्ता देण्यात आला आहे. मुलगी असल्याने दोन लाख मिळणार, या अफवांना नागरिक मोठय़ा प्रमाणात  अकोट परिसरात बळी पडत आहेत. फॉर्म विक्री करणार्‍यांनी सुद्धा या  अफवांचा फायदा घेत प्रत्येक अर्ज २0 ते २५ रुपये, भरून देणे व पोस्ट  करण्यापर्यंत प्रत्येकाकडून १00 ते १५0 रुपये उकळत आहेत. आतापर्यंत अकोट तालुक्यात शेकडो अर्जांची विक्री झाली असून, ओळख पत्रांकरिता नागरिक नगरसेवक व सरपंचांच्या घरी गर्दी करीत आहेत. हे सर्व  अर्ज पोस्टातून दिल्लीलासुद्धा पाठविले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र अशी कोण तीही योजना केंद्र शासनाने लागू केली नाही. शिवाय अशा योजनांचे अर्ज सुद्धा थेट पोस्टाद्वारे मागविले जात नाही, तर  समाजकल्याण विभागामार्फत शासकीय कार्यालयामधून भरून घेतले जातात;  परंतु शासकीय कार्यालयांमध्ये हा अर्ज मिळत नसून, खासगी दुकानांमधून हा  अर्ज विक्री केले जात आहेत. याबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. त्यामुळे ही  विक्री जोमाने वाढली असून, याप्रकरणी सखोल चौकशी करून, जनतेची  फसवणूक थांबविणे गरजेचे झाले आहे. 

अर्जाची छपाई, विक्री करणार्‍यांची चौकशी ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या अर्जाची विक्री करणार्‍या  दुकानदारांची व ते भरून देऊन जनतेची फसवणूक करणार्‍या टोळींची चौकशी  करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने केंद्र शासनाच्या अर्जाची छ पाई व विक्री करणार्‍यांचा शोध घेत कठोर कारवाई करून, या लुटीला आळा  घालणे गरजेचे आहे. 

अकोट तालुक्यात प्रधानमंत्री बेटी बचाओ योजनेंतर्गत दोन लाख प्रत्येक  मुलीला मिळणार, अशी कोणतीही योजना कार्यान्वित नाही. जनतेने अशा  प्रकाराला बळी न पडता शासकीय कार्यालयांमध्ये पडताळणी करावी व ज्यांची  अर्ज विकत घेऊन फसवणूक झाली असेल, त्यांनी थेट तक्रार करावी. - विश्‍वनाथ घुगे, तहसीलदार अकोट 

टॅग्स :akotअकोट