शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एका सिटी बसचा दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 02:09 IST

अकोला : शहरवासीयांच्या सुविधेसाठी जानेवारी महिन्यात दाखल झालेल्या पाच सिटी बसेसपैकी चार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी एका (पाचव्या) सिटी बसचा भाजपाच्यावतीने दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा घेण्यात आल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्दे३0 सिटी बसेसचा पत्ताच नाहीअकोलेकर प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरवासीयांच्या सुविधेसाठी जानेवारी महिन्यात दाखल झालेल्या पाच सिटी बसेसपैकी चार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी एका (पाचव्या) सिटी बसचा भाजपाच्यावतीने दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा घेण्यात आल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. गुडधी ते थेट डाबकीपर्यंत धावणार्‍या सिटी बसचा उमरी येथे महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत, तर डाबकी  येथे उपमहापौर वैशाली शेळके यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होऊन, बस सेवेला सुरुवात करण्यात आली. शहरात सिटी बसची सेवा सुरू होऊन अकरा महिन्यांचा कालावधी होत असला, तरी उर्वरित ३0 सिटी बसेसचा अद्यापही पत्ता नसल्याचे चित्र आहे. शहरवासीयांच्या सुविधेसाठी शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेत, महापालिका प्रशासनाने ऑक्टोबर २0१६ मध्ये निविदा राबवली होती. त्यावेळी शहरात ३५ बसेसचा ताफा दाखल होणार होता. प्रशासनाने बस सेवा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर, श्रीकृपा ट्रॅव्हल्सने सादर केलेली निविदा मंजूर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाच बसेस आणि त्यानंतर महिनाभराच्या आत १५ बसेस व दुसर्‍या टप्प्यात उर्वरित १५ बसेस दाखल होतील, असा दावा सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाच बसेस दाखल झाल्या. यापैकी चार बसेस रस्त्यावर धावत आहेत. अकरा महिन्यांचा कालावधी उलटत असला, तरी अद्यापही उर्वरित बसेसचा थांगपत्ता नाही. श्रीकृपा ट्रॅव्हल्सकडे पाचपैकी चार बसेस रस्त्यावर धावत असताना एक बस उभी होती. ही बस डाबकी ते गुडधीपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेत सत्ताधार्‍यांनी सोमवारी सिटी बसचे चक्क दोन ठिकाणी लोकार्पण केले. महापौर विजय अग्रवाल, पूर्व झोनचे सभापती मिलिंद राऊत, रूपराव पाटील तसेच गुडधी-उमरी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत गुडधी येथे, तसेच डाबकी येथे उपमहापौर वैशाली शेळके, भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर पाटील, ज्येष्ठ समाजसेवक विष्णुपंत गंगाखेडकर, नगरसेवक अनिल गरड, सुनील क्षिरसागर, सतीश ढगे, पश्‍चिम झोन सभापती अमोल गोगे, नगरसेविका रंजना विंचनकर, नीलेश निनोरे यांच्या उपस्थितीत सिटी बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

उर्वरित बसेस कधी?श्रीकृपा ट्रॅव्हल्ससोबत ३५ सिटी बसेसचा करारनामा करण्यात आला आहे. अकरा महिन्यांपासून शहरात केवळ चार बसेस धावत आहेत. उर्वरित ३0 बसेसची सुविधा नसल्यामुळे शहरवासीयांची परवड होत आहे. त्यामुळे सदर बसेस शहरात कधी दाखल होतील, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहर