शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांचा मार्ग खुला; मजूर कसे आणणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:42 IST

रस्त्यांची कामे करण्यासाठी मजूर वर्ग कसा आणायचा, असा पेच मनपा प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केली आहे. या कालावधीत २० एप्रिलपासून रस्त्यांच्या प्रलंबित कामांना सुरुवात करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील विकास कामांचा मार्ग खुला झाला असला तरीही सदर रस्त्यांची कामे करण्यासाठी मजूर वर्ग कसा आणायचा, असा पेच मनपा प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे. यावर मनपा आयुक्त संजय कापडणीस कसा मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा देशात व महाराष्ट्रात शिरकाव झाला असून, कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ मार्च रोजी संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली होती. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती.यादरम्यान देशात तसेच महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट येईल, अशी अपेक्षा वर्तविली जात होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी कायम ठेवली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीची मुदत ३ मेपर्यंत वाढविली. या कालावधीत २० एप्रिलपासून प्रलंबित विकास कामांना निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच महापालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांचा समावेश आहे.प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात महापालिका प्रशासनाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून दिशानिर्देश प्राप्त झाल्याची माहिती आहे. असे असले तरी ही कामे प्रत्यक्षात सुरू करताना महापालिका प्रशासनाला अर्थात कंत्राटदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शहरातील प्रलंबित रस्ते, नाल्या, नाल्यांवरील धापे, उद्यानांचे सौंदर्यीकरण, सामाजिक सभागृह आदी बांधकाम करीत असताना आपसात ‘सोशल डिस्टन्सिंग’ कसे ठेवता येईल, याची कंत्राटदारांना चिंता सतावत आहे. यासोबतच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपसात किमान साडेतीन ते चार फुटाचे अंतर राखणे अपेक्षित असल्यामुळे प्रत्यक्षात कसे काम करायचे, असे नानाविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. यातून महापालिका आयुक्त संजय कापडणीस कशा पद्धतीने मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

... तर मजुरांना द्याव्या लागतील पासेसशहरातील प्रलंबित विकास कामांना प्रत्यक्षात सुरुवात करताना कंत्राटदारांना मजुरांची आवश्यकता आहे. काम करणारे मजूर शहराच्या विविध भागात विखुरलेले आहेत. त्यामुळे अशा मजुरांना मनपा प्रशासनाकडून पासेस द्याव्या लागतील. कोरोनाचा संसर्ग व प्रसार लक्षात घेता मजुरांना दिलेल्या पासेसचा गैरवापर होणार नाही, याची काळजीसुद्धा महापालिकेला घ्यावी लागणार आहे.काम करताना ‘सोशल डिस्टन्सिंग’ शक्य आहे का? रस्ते, नाल्या यासह विविध विकास कामे करताना प्रत्यक्षात ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखणे मजुरांना शक्य होणार आहे का, याकडेही मनपाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. तसे न झाल्यास कोरोनाचा संसर्ग किंवा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रलंबित विकास कामांना सुरुवात करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात काम करताना संसर्गजन्य कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची दक्षता महापालिकेला घ्यावी लागणार आहे. त्यासंदर्भातील धोरण निश्चित केल्यानंतरच मनपाच्या अखत्यारीत असणाऱ्या विकास कामांना सुरुवात केली जाईल.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाLabourकामगार