शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी होणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:34 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  नाशिक येथे अनेक प्रकारचे गैरप्रकार झाले आहेत.  त्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्येसुद्धा उमटले आहे. मुक्त  विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी  राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना समिती  नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुलगुरूंनी  अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ.  संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय  समिती नियुक्त केली आहे. 

ठळक मुद्दे डॉ. संजय खडक्कार यांच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय समि ती नियुक्तयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ये थे अनेक प्रकारचे गैरप्रकार 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  नाशिक येथे अनेक प्रकारचे गैरप्रकार झाले आहेत.  त्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्येसुद्धा उमटले आहे. मुक्त  विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी  राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना समिती  नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुलगुरूंनी  अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ.  संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय  समिती नियुक्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक येथील यशवंतराव  मुक्त विद्यापीठात भोंगळ कारभार सुरू असून, अनेक  गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी स्थानिक आमदार  बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने राज्यपाल सी.  विद्यासागर राव यांच्याकडे थेट तक्रारी केल्या होत्या. या  तक्रारींची दखल घेत, राज्यपाल सी. विद्यासागर राव  यांनी तक्रारींबाबत मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे  विचारणा केली आणि अहवाल मागितला. मुक्त विद्या पीठातील गैरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश  राज्यपालांनी दिल्यावर कुलगुरूंनी चौकशी समिती  केली. समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी महाविद्यालया तील प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी नियुक्ती केली,  तसेच मुंबई येथील के.जे. सोमय्या अभियांत्रिकी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश उकरांदे, शासनाच्या  चीफ अकाउंटंट्स अँण्ड ट्रेझरीचे नवृत्त सहसंचालक  बी.जी. निर्मल यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली. डॉ.  खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली समिती मुक्त विद्या पीठातील गैरकारभाराची चौकशी करून ४५  दिवसांमध्ये आपला अहवाल कुरूगुरूंना सादर कर तील.