शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘ओपन स्पेस’चे करारनामे होणार रद्द; मनपाच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 02:24 IST

अकोला : सार्वजनिक हिताच्या सबबीखाली ले-आउटमधील खुली जागा (ओपन स्पेस) ताब्यात ठेवून विकास कामांना तिलांजली देणार्‍या शहरातील सामाजिक संस्थांचे करारनामे व त्यांना दिलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. याप्रकरणी पाच सदस्यीय समितीचे गठन करून समितीने सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. 

ठळक मुद्देतपासणीसाठी समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक हिताच्या सबबीखाली ले-आउटमधील खुली जागा (ओपन स्पेस) ताब्यात ठेवून विकास कामांना तिलांजली देणार्‍या शहरातील सामाजिक संस्थांचे करारनामे व त्यांना दिलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. याप्रकरणी पाच सदस्यीय समितीचे गठन करून समितीने सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. महापालिकेच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मनपा क्षेत्रात एलईडी पथदिवे लावण्यासाठी शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केल्यामुळे नगरसेवकांनी प्रस्तावित केलेल्या एलईडी पथदिव्यांची कामे रद्द करून ईईएसएलमार्फत काम करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी प्रस्तावित केलेल्या कामांमध्ये बदल करून नवीन प्रस्ताव सादर करण्याच्या मुद्यावर सभागृहात चर्चेच्या फैरी झाडल्या. शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी शासनाने परस्पर नियुक्त केलेल्या ईईएसएल कंपनीवर तीव्र आक्षेप नोंदवला. मिश्रा यांच्या मदतीला विरोधी पक्षनेता साजीद खान, डॉ. जिशान हुसेन, राकाँचे फैयाज खान धावून आले. ईईएसएलच्या मुद्यावर भाजप नगरसेवक सतीश ढगे, आशिष पवित्रकार यांनी आक्षेप नोंदवला. यावेळी ले-आउटमधील ‘ओपन स्पेस’ सामाजिक संस्थांच्या ताब्यात ठेवण्याच्या विषयावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा पार पडली. महापौर विजय अग्रवाल यांनी हा विषय प्रशासनाने मांडला नसून, खुल्या जागांवर कब्जा करून ठेवल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारी पाहता आम्हीच प्रशासनाला खुल्या जागेच्या धोरणाविषयी माहिती सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सभागृहात स्पष्ट केले. ले-आउटमधील खुल्या जागांवर स्थानिक रहिवाशांचा अधिकार असल्यामुळे यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांनी धोरणांत बदल करण्याचे निर्देश औरंगाबाद उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. या मुद्यावर नगररचनाकार विजय इखार सभागृहाला सविस्तर माहिती देऊ शकले नाहीत. यावर सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नापसंती व्यक्त केली.  ‘ओपन स्पेस’वर स्थानिक नागरिकांचा अधिकार असेल, तर धार्मिक स्थळांना जमीनदोस्त का केले, असा सवाल मिश्रा यांनी उपस्थित केला. ‘ओपन स्पेस’ ताब्यात घेऊन त्यांचा विकास न केलेल्या संस्थांची माहिती सभागृहात सादर करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. सुमन गावंडे यांनी शहरातील सर्वच खुल्या जागांचा सर्व्हे करून त्यांची इत्थंभूत माहिती सादर करण्याची सूचना केली. अखेर ‘ओपन स्पेस’ ताब्यात घेऊन त्यांचा विकास न करणार्‍या तसेच विकास कामांना आडकाठी निर्माण करणार्‍या संस्थांची परवानगी व करारनामे रद्द करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. खुल्या जागेसंदर्भात नगरसेवकांच्या सूचना लक्षात घेता पाच सदस्यीय समितीचे गठन करण्याचा निर्णय महापौर विजय अग्रवाल यांनी केला. समितीने सात दिवसांच्या आत तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका