शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

घटना बदलविण्याची भाषा करणा-यांनाच बदलवून टाकू

By admin | Updated: April 25, 2016 02:04 IST

रामदास आठवले यांचा इशारा.

बुलडाणा: केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त देशभर कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांचा जयजयकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे बाबासाहेबांचे पाईक आहेत. ते आरएसएसचे ऐकत नाहीत. बाबासाहेबांच्या संविधानावर त्यांचा विश्‍वास असून, ते घटनेप्रमाणे देश चालवित आहेत. तरीही घटना बदलविण्याची कोणी भाषा केल्यास आम्ही त्यालाच बदलवून टाकू, असा इशारा खा. रामदास आठवले यांनी दिला. जाती तोडो, भारत जोडो, समता अभियानाअंतर्गत खासदार आठवले यांनी काढलेली भारत भीम यात्रा रविवारी दुपारी बुलडाणा येथे दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खा. आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले काम करीत आहेत. इंदू मिलच्या जागेवर होणारे बाबासाहेबांचे भव्य स्मारक, महु येथील बाबासाहेबांचे निवासस्थान, याशिवाय बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेल्या इतर स्थळांचा विकास करण्याची भूमिका मोदींनी घेतली आहे. मागासवर्गीयांचे आरक्षण सुध्दा हे सरकार काढू शकत नाही. सरकारसंदर्भात वावड्या उठविल्या जात आहेत, त्यावर विश्‍वास ठेवू नका. जर कुणी संविधान बदलविण्याची भाषा करीत असेल तर त्याला सर्वप्रथम आर.पी. आय. रस्त्यावर उतरुन विरोध करेल, कारण आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत. सरकारची प्रत्येक भूमिका आम्हाला मान्य असेलच असे नाही. आमचे स्वतंत्र अस्तीत्व आहे. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, प्रदेश कार्यध्यक्ष बाबुराव कदम, विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुधाकर तायडे, युथ रिपब्लीकनचे अध्यक्ष विजय साबळे, केशव सरकटे, जिल्हाध्यक्ष नरहरी गवई उपस्थित होते.विदर्भ राज्य व्हावे ही भाजपची भूमिका !विदर्भ राज्य वेगळे व्हावे, ही भाजपची सुरूवातीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेला आरपीआयचासुध्दा पाठींबा आहे. कारण भाषावार प्रांतरचनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संमती होती. त्यामुळे वेगळा विदर्भ होईल असा विश्‍वास वाटतो. विदर्भ व मराठवाड्यावर कॉंग्रेसनेच अन्याय केला. विदर्भाच्या विकासाचे खरे मारक काँग्रेसवालेच आहेत, विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्प अद्याप पुर्णत्वास गेला नाही. चंद्रपूर, गडचिरोलीपासून तर बुलडाण्यापर्यंतचे अनेक प्रकल्प व विकासाच्या योजना काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. हे प्रश्न मार्गी लागले असते तर आज वेगळ्या विदर्भाचा प्रश्न पुढे आलाच नसता. आता शिवसेना सोडली तर, सर्वच राजकिय पक्ष वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत. प्रकाश आंबेडकरांनाच नकोय ऐक्य !रिपाइंचे ऐक्य व्हावे ही प्रामाणिक भूमिका माझी नेहमीच राहीली आहे. एवढेच काय प्रकाश आंबेडकरांनीच या ऐक्याचे श्रेय घेऊन त्यांनीच प्रमुख बनावे, असेही मी वेळोवेळी बोललो आहे. मात्र मी ऐक्यासाठी बैठक बोलाविली की, प्रकाश आंबेडकर गैरहजर राहतात, अशी खंत खा. आठवले यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर आपणास का टाळतात? असे विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा मी ऐक्याची भूमिका घेतो, तेव्हा त्यांना असे वाटते की, शरद पवारांनीच आठवलेंना पुढे केले काय, त्यामुळे ते चर्चेत सहभागी होत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी १९९0 मध्ये ऐक्य कसे तुटले याचा किस्साही सांगीतला. प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.