शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एकच हुंकार...जय भीम... ढोल-ताशांच्या निनादात निघाली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:45 IST

अकोला : ढोल-ताशांचा गजर...हातात पंचशील व निळे ध्वज आणि जय भीमचा जयघोष करीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन ...

अकोला: ढोल-ताशांचा गजर...हातात पंचशील व निळे ध्वज आणि जय भीमचा जयघोष करीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुक्रवारी दुपारी रेल्वे स्टेशन चौक परिसरातून धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीच्या प्रारंभी अश्वांवर स्वार झालेले समता सैनिक दलाचे सदस्य होते. पंचशील ध्वज हातात घेऊन ‘जय भीम’च्या घोषासह मिरवणूक पुढे निघाली.जिल्हाभरातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेले युवक, युवती, महिला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बहुसंख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आखाडा व व्यायामशाळेचे सदस्य लेजीम, लाठीकाठी, चक्र, तलवारबाजी, मलखांबसारखे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करीत होते. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. युवक-युवती हातात लेजीम घेऊन मिरवणुकीसमोर नृत्याचा फेर धरीत होत्या. हातात निळे ध्वज घेऊन भीमसैनिक पुढे सरकत होते. रेल्वे स्थानक, शिवाजी पार्क, होमिओपॅथी महाविद्यालय चौक, मनकर्णा प्लॉट चौक, शहीद अब्दुल हमीद चौक, रिगल टॉकीज मार्गावर ठिकठिकाणी भीमसैनिकांच्या स्वागतासाठी स्टॉल उभारण्यात आले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांना सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने मसाला भात, पोहे, पुरी-भाजीचे वितरण करण्यात आले. मिरवणूक मार्गावरील चौका-चौकांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आणि पुतळे उभारण्यात आले होते. या दोन्ही महामानवांच्या प्रतिमा, पुतळ्यांसमोर आकर्षक सजावट करण्यात आली होती. या महामानवांसमोर प्रत्येक जण नतमस्तक होत होता. मिरवणूक उदय टॉकिजजवळ पोहोचल्यावर सायंकाळी भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आमदार बळीराम सिरस्कार, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरिदास भदे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जि.प. उपाध्यक्ष जमीर-उल्लाखा पठाण, मनोहर पंजवाणी, राजेंद्र पातोडे आदी नेते सजविलेल्या रथावर विराजमान झाले. या ठिकाणाहून मिरवणूक सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पोहोचली. (प्रतिनिधी)

चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष!प्रज्ञा विकास मंडळ, तारफैल, पंचशील संघ म्हैसपूरच्या महिला व युवतींनी लाठीकाठी, अग्निचक्राचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. सत्यशील संघ व्यायाम शाळा, न्यू भीमगर्जना मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी विविध शारीरिक प्रात्यक्षिक सादर करून मिरवणुकीत सहभागी नागरिकांचे लक्ष वेधले. एवढेच नाही, तर प्रज्ञा विकास मंडळाच्या चिमुकल्या कार्यकर्त्यांनीही लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.येथील न्यू भीमगर्जना बहूद्देशीय व क्रीडा मंडळाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीत शुक्रवारी दुपारी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मंडळातील महिला, युवती व युवकांनी लाठीकाठी, भोवराचक्र, अग्निचक्र यासह अनेक शारीरिक कसरती सादर केल्या. या कसरतींनी मिरवणुकीत सहभागी नागरिकांचे लक्ष वेधले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर