शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात केवळ आठ जणांनी केला प्लाझ्मा दान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 10:30 IST

बरे झालेल्या रुग्णांपैकी केवळ ८ रुग्णांनी आतापर्यंत प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात २९ जूनपासून प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली; परंतु किचकट प्रक्रियेमुळे बरे झालेल्या रुग्णांपैकी केवळ ८ रुग्णांनी आतापर्यंत प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाविषयीची भीती आणि किचकट प्रक्रियेमुळे बरे झालेल्या रुग्णांचे रक्त संकलनाचे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे.कोरोनावर अद्यापही प्रभावी औषध आले नाही; परंतु प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचाराला मान्यता मिळाल्याने सर्वसामान्यांच्या आशा वाढल्या आहेत. सर्वोपचार रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरूदेखील झाली असून, आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या ८ रुग्णांनी प्लाझ्मा दान केले. किचकट प्रक्रियेमुळे प्लाझ्मासाठी रक्तसंकलनात आरोग्य यंत्रणेला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे होती, त्यांच्याच रक्तामधून प्लाझ्मा घेणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले; परंतु जिल्ह्यात आतापर्यंत दाखल बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नव्हती.त्यामुळे त्यांच्यात आवश्यक अ‍ॅन्टीबॉडीज विकसित झालेल्या नसल्याने त्याचा फायदा प्लाझ्मा थेरेपीमध्ये शक्य नाही.या आहेत समस्या

  1. बहुतांश रुग्णांना कोरोनाची लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांचे रक्त संकलन शक्य नाही
  2. लक्षणे असणारे रुग्ण बरे झाल्यावर रक्तदान करण्यास तयार नाहीत
  3. रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवसांची करावी लागते प्रतीक्षा
  4. बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी पर्याप्त मनुष्यबळ नाही.

आतापर्यंत ८ जणांनी प्लाझ्मा दिला असून, आणखी पाच ते सहा जण प्लाझ्मा दान करण्यास इच्छुक असून, प्लाझ्मा संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा.- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय ब्लड बँक, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या