शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अनुदानासाठी ७१ शाळाच पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 10:12 IST

१३३ शाळांपैकी अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने त्यांचे अनुदान वाटप अधांतरी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आरटीईनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क संबंधित शाळांना अदा करण्यासाठी ७१ शाळांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेणार आहेत. तर उर्वरित १३३ शाळांपैकी अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने त्यांचे अनुदान वाटप अधांतरी आहे.शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कापोटीचे अनुदान शासनाकडून दिले जाते. त्यानुसार त्या शाळांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती अनुदान देण्यापूर्वी त्या मुद्यांचा पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सप्टेंबर २०१९ मध्ये ५२ पथकांकडून जिल्ह्यातील २०४ शाळांची एकाच वेळी धडक तपासणी करण्यात आली. पडताळणीच्या मुद्यांमध्ये संबंधित शाळा शासकीय जागेत आहे का, किंवा कमी शुल्काने भाडेपट्ट्यावर जागा घेतली आहे का, त्यासोबतच शाळांमध्ये पालक शिक्षकांच्या बैठकीत शुल्क ठरले का, त्याला पालकांची मंजुरी आहे का, आरटीईच्या निकषाची संबंधित शाळांकडून पूर्तता केली का, प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची आधार पडताळणी झाली का, त्यांची यादी प्रसिद्ध केली का, शैक्षणिक शुल्क नियमानुसार घेतले जाते का, या सर्व मुद्यांची पडताळणी पथकांकडून करण्यात आली.त्यापैकी शाळांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क प्रतिपूर्ती अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार झाला. दरम्यान, याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी १७ मे रोजी व्हीसीद्वारे निर्देश दिले. अनुदान देताना काही अटींमध्ये अंशत: बदल केल्याचे सांगितले. त्यामध्ये शाळांचे पात्रतेच्या आदेशातही बदल झाला. सोबतच शाळांमध्ये प्रवेश दिलेल्यापैकी आरटीईचे अनुदान केवळ आधारकार्डच्या संख्येतच देण्यात यावे, आरटीईच्या निकषाची संबंधित शाळांकडून पूर्तता केली का, प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची आधार पडताळणी झाली का, त्यांची यादी प्रसिद्ध केली का, शैक्षणिक शुल्क नियमानुसार घेतले जाते का, या सर्व मुद्यांची पुन्हा पडताळणी करून अहवाल मागवण्यात आला. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापकांनी १० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे २९ मे रोजी बजावण्यात आले.त्यानंतर दोनच दिवसात त्या आदेशात बदल करून ५ जूनपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव मागवण्यात आले. त्यानुसार तातडीने अनुदान वाटप करून तसा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करण्याचेही म्हटले. शिक्षण विभागाने घाई केली तरीही केवळ ७१ शाळांचे प्रस्तावच पात्र ठरल्याने इतर संस्थाचालकांची तगमग वाढली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र